-
सूप म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. कमी वेळात, मोजक्या साहित्यांत अगदी झटपट होणारा चविष्ट पदार्थ म्हणजे सूप.
-
आजारपणात तोंडाला चव आणणारा ते समारंभाची शोभा वाढवणारा पदार्थ म्हणून सूपकडे पाहिलं जातं.
-
इतकच काय, तर पावसाळा आणि हिवाळ्यातील गारव्यात शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी गरमागरम सूप या पदार्थाला पसंती मिळते.
-
सूपमध्ये वेगवेगळ्या भाज्या आणि पदार्थ असतात. त्यामुळे सूप हे पौष्टिक मानले जाते.
-
यात भरपूर प्रमाणात प्रोटिन्स आणि पोषकतत्वे आढळतात.
-
सूप हे पचण्यास हलके असते. तसेच सूप हे वजन कमी करण्यास देखील मदत करते.
-
चिकन सूप – चिकन सूप हे आपल्यापैकी अनेकांचं आवडतं आहे. चिकन सूप वजन कमी करण्यास मदत करते. टोमॅटो आणि बीन्सने तुम्ही स्वादिष्ट चिकन सूप बनवू शकता.
-
भोपळ्याचे सूप – भोपळ्याचे सूप देखील वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. यातून भरपूर प्रमाणात प्रोटिन्स मिळतात.
-
पालक सूप – पालक सूप हे पोषकयुक्त असते. जेवण बनवण्याचा कंटाळा आला असल्यास गरमागरम पालक सूप तुम्ही बनवू शकता. यामधून शरीराला आवश्यक असणारी पोषकतत्वे मिळतात.
-
टोमॅटो सूप – वजन कमी करण्यासाठी प्रोटिनयुक्त भरपूर पदार्थ असलेले सूप पिण्याची आवश्यकता असते असे नाही. टोमॅटो सूप देखील वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते.
-
कोबीचे सूप – आरोग्याची विशेष काळजी घेणाऱ्या व्यक्ती कोबीपासून बनविण्यात येणाऱ्या सूपला प्राधान्य देतात. कोबीचे सूप वजन कमी करण्यास अत्यंत उपयुक्त मानले जाते.
-
तुम्हीही या वेगवेगळ्या सूप रेसिपी नक्की ट्राय करून बघा. या प्रोटिनयुक्त सूपचा आहारात समावेश करा. (सर्व फोटो सौजन्य : freepik)
Dr. Ambedkar Jayanti: डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर HD Images