-
सामुद्रिक शास्त्रानुसार शरीरावरील प्रत्येक तीळाचे वेगळे महत्त्व आणि अर्थ आहे. असे म्हटले जाते की शरीराच्या वेगवेगळ्या भागांवरील तीळ एखाद्या व्यक्तीचे नशीब किंवा त्याचे आयुष्य कसे असेल हे सांगतात.
-
शरीराचा आकार किंवा त्यावर असलेल्या तीळाच्या खुणा पाहून भविष्याचा अंदाज सामुद्रिक शास्त्रात केला जातो. जाणून घ्या सामुद्रिक शास्त्र काय सांगते…
-
सामुद्रिक शास्त्रात असे म्हटले आहे की ज्या लोकांच्या चेहऱ्यावर तीळ असतो, ते भाग्यवान असतात.
-
अशा लोकांकडे भरपूर पैसा असतो. असे लोक आयुष्यभर पैशाच्या तंगीचा सामना करत नाहीत.
-
ज्या व्यक्तीच्या छातीवर तीळ असतो, ती व्यक्ती आयुष्यात खूप पैसा कमावते.
-
अशा व्यक्तीचा खिसा सतत नोटांनी भरलेला असतो. अशा लोकांवर लक्ष्मी देवीची कृपा सदैव राहते.
-
असे मानले जाते की ज्या लोकांच्या पोटावर तीळ असतो, त्यांना आयुष्यभर भरपूर पैसा मिळतो.
-
पण त्याचबरोबर असे देखील म्हटले जाते की ज्या लोकांच्या पोटावर तीळ आहे त्यांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्या असतात.
-
त्यामुळे त्यांच्या कमावलेल्या पैशांपैकी बहुतांश रक्कम आरोग्याशी संबंधित खर्चावर खर्च होते.
-
ज्या लोकांच्या उजव्या आणि डाव्या दोन्ही हातांवर तीळ असते, अशा लोकांची आर्थिक स्थिती नेहमीच मजबूत असते.
-
अशा लोकांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही. पैशांमुळे त्याचे कोणतेही काम अडत नाही.
-
सामुद्रिक शास्त्रात असे सांगितले आहे की ज्यांच्या हातावर तीळ आहे ते लोक आपल्या मेहनतीने पैसा कमावतात.
-
उजव्या हातावर तीळ असलेला व्यक्ती जास्त संपत्तीचा मालक बनतो. अशा लोकांची तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली असते.
-
अशा लोकांच्या वयानुसार पैसाही सतत वाढत असतो. असे म्हणतात की अशा लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा नेहमीच असते.
-
सामुद्रिकशास्त्रात असे मानले जाते की ज्या व्यक्तीच्या हाताच्या सर्वात लहान बोटावर म्हणजेच करंगळीवर तीळ असतो, अशी व्यक्ती खूप श्रीमंत असते.
-
कालांतराने, एक टप्पा येतो जेव्हा त्याची गणना करोडपतींमध्ये होऊ लागते.
-
येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. (Photo : Pexels)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”