-
लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येक विवाहित जोडप्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. पण अनेकदा कामाच्या नादात पुरुष मंडळी आपल्या लग्नाचा वाढदिवस विसरतात.
-
तुम्ही देखील आपल्या लग्नाचा वाढदिवस काही कारणामुळे विसरला का ? लग्नाचा वाढदिवस विसरणे हा कोणताही गुन्हा नाही, पण यामुळे रागावलेल्या बायकोचे मन वळवणे फारच कठीण असते.
-
अशावेळी आपल्या जोडीदाराची माफी मागून तुम्ही हा दिवस आणखी चांगल्या पद्धतीने साजरा करू शकता हे जास्त महत्त्वाचे आहे.
-
आज आपण जाणून घेणार आहोत, आपल्याकडून जर अशी चूक झाली तर त्याला कसं सामोरं जावं आणि आपल्या जोडीदारासोबत हा दिवस आणखी चांगल्या पद्धतीने कसा साजरा करावा.
-
तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी एखादे छानसे सरप्राईज प्लॅन करू शकता. तुमच्या पती/पत्नीची आवड लक्षात घेऊन तुम्ही त्यांच्यासाठी भेटवस्तु खरेदी करू शकता.
-
जर तुमच्या जोडीदाराला प्रवासाची आवड असेल तर तुम्ही सुट्ट्यांच्या वेळी तुम्ही तुमच्या दोघांसाठीच रोमँटिक सहलीचे नियोजन करू शकता.
-
तिकीट, हॉटेल बुकिंग इत्यादी आधीच बुक करून लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी जोडीदाराला सरप्राईज देऊ शकता.
-
जर तुम्ही तुमच्या लग्नाचा वाढदिवस चुकून विसरला असाल, तर तुमच्या रागावलेल्या बायकोचं मन जिंकण्यासाठी फुलं हा एक सर्वात उत्तम पर्याय ठरू शकतो.
-
आपल्या रागावलेल्या बायकोचा राग घालवण्यासाठी तुम्ही सर्वकाही करून पाहिले असेल तर फुलांचा गुच्छ हा एक उत्तम पर्याय आहे.
-
फुलांचा गुच्छ देऊन तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त करा. यामुळे नक्कीच तुमच्या बायकोचा राग निवळेल. तसेच त्यांच्या अनुपस्थितीत तुम्ही सुंदर फुलांनी घर देखील सजवू शकता.
-
खास प्रसंगी आपल्या जोडीदाराने आपल्यासोबत वेळ घालवावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. अशावेळी तुम्ही तुमच्या जोडीदाराला पुरेसा वेळ द्या.
-
यासाठी तुम्ही एकत्र चित्रपट पाहायला किंवा जोडीदाराची आवड लक्षात घेऊन खरेदीलाही जाऊ शकता.
-
जर तुम्ही बाहेर जाण्याचा विचार करत नसाल तर तुम्ही लग्नाच्या वाढदिवसानिमित्त घरीच एखादा छानसा पदार्थ बनवून आपल्या जोडीदाराला सरप्राईज देऊ शकता. असे केल्याने तुम्हा दोघांना खूप खास वाटेल. (Photo : Pexels)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख