-
७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी हा आठवडा व्हॅलेंटाइन वीक म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर १५ फेब्रुवारीपासून २१ फेब्रुवारीपर्यंत अँटी व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा केला जातो. (Photo- Pixabay)
-
जे लोक व्हॅलेंटाईन डे एन्जॉय करत नाहीत किंवा अविवाहित आहेत किंवा अलीकडेच ब्रेकअप झाले आहेत ते व्हॅलेंटाईन डे नंतर लगेच अँटी-व्हॅलेंटाइन वीक साजरा करू शकतात. (Photo- Pixabay)
-
१५ फेब्रुवारी, स्लॅप डे: सात दिवस चॉकलेट्स, टेडी बेअर्स आणि आश्वासने देऊन तुमच्या प्रियकराला आकर्षित केल्यानंतर १५ फेब्रुवारी हा दिवस ‘स्लॅप डे’ म्हणून ओळखला जातो. ज्यांना फसवणूक करताना पकडले गेले आहे. तसेच ब्रेकअप होण्याची वाट पाहत असलेल्यांसाठी हा दिवस आहे. हा दिवस अँटी-क्यूपिड आठवड्याची सुरुवात आहे. याचा अर्थ असा नाही की खरंखरच कानाखाली मारायची. भावनांना आवर घालत पुढे जाण्याचा दिवस आहे. (Photo- Pexeles)
-
१६ फेब्रुवारी, किक डे: किक डे १६ फेब्रुवारीला साजरा केला जातो. मनातून व्यक्तीबद्दल विचार दूर करण्याचा दिवस. गेल्या आठवड्यात तुम्हाला मिळालेल्या कोणत्याही भेटवस्तूंबद्दल तुम्ही नाखूष असल्यास बाहेर काढण्यासाठी हा योग्य दिवस आहे. (Photo- Pexeles)
-
१७ फेब्रुवारी, परफ्यूम डे: स्लॅप आणि किक डे नंतर या दिवशी पुन्हा एकदा जवळीक साधण्याचा प्रयत्न करता येतो. या दिवशी प्रिय व्यक्तीला परफ्यूम देऊन गैरसमज दूर करता येतो. आयुष्याला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करता येते. (Photo- Pixabay)
-
१८ फेब्रुवारी, फ्लर्टिंग डे: असं बोललं जातं की, प्रेमात रोमांस टिकवून ठेवण्यासाठी फ्लर्टिंग आवश्यक आहे. आयुष्यात प्रेम असेल आणि त्या प्रेमात रोमान्स आणि फ्लर्ट नसेल तर प्रेम ही संकल्पनाच बोथट होते. हे प्रेम जिवंत ठेवण्यासाठी फ्लर्टिंग डे साजरा केला जातो. (Photo- Pixabay)
-
१९ फेब्रुवारी, कन्फेशन डे: कबुलीजबाब नेहमीच अपराधीपणाचे ओझे कमी करते आणि त्यासाठी १९ फेब्रुवारी पेक्षा चांगला दिवस नाही. तुमच्या भावनांना मोकळी वाट करून देण्याचा हा दिवस आहे. तुमच्या चुकांची कबुली द्या. (Photo- Pixabay)
-
२० फेब्रुवारी, मिसिंग डे: तुमच्या आवडत्या व्यक्तीला सांगण्याची आणि तुमच्या खर्या भावना व्यक्त करण्यासाठी ही नेहमीच चांगली वेळ असते. हे मित्र, कुटुंब सदस्य किंवा क्रश असू शकतो. (Photo- Pixabay)
-
२१ फेब्रुवारी, ब्रेकअप डे: अँटी व्हॅलेंटाईन वीक ब्रेकअप डेने संपतो. जर तुम्ही नातेसंबंधात राहून कंटाळले असाल किंवा तुमची मनःशांती बिघडली असेल, तर या दिवशी स्वातंत्र्य निवडण्याची योग्य संधी आहे. (Photo- Pixabay)

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य