श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने माघी पौर्णिमा निमीत्त श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात आकर्षक व नयनरम्य अशी द्राक्षाची आरास करण्यात आली आहे.
माघी पौर्णिमा निमीत्त श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात आकर्षक व नयनरम्य अशी द्राक्षाची आरास केली आहे. (photo credit: श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर)
आजच्या या मनमोहक सजावटीमुळे विठ्ठल रुक्मिणी माता या द्राक्षांच्या बागेत असल्याचे आभास भाविकांना मिळत होता. (photo credit: श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर)
आज माघ शुद्ध पौर्णिमेनिमित्त पंढरपूर तालुक्यातील एका शेतकरी भक्ताने विठ्ठल मंदिरास शेतातील द्राक्षांची सुंदर आरास करण्यासाठी द्राक्ष दान केली आहे.(photo credit: श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर)
आज पौर्णिमेला माघ यात्रेची सांगता होत असताना विठ्ठल मंदिरास द्राक्षांची सुंदर आरास करण्यात आली आहे. तसेच मंदिर सजावटीसाठी द्राक्ष दान केलेल्या शेतकरी भक्ताने आपले नाव जाहीर न करण्याची विनंती मंदिर समितीला केली होती. (photo credit: श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर)
शेतकरी भक्ताने आपल्या शेतातील १ हजार किलो द्राक्षे सजावटीसाठी विठ्ठल मंदिरात आणली. (photo credit: श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर)
मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने विठ्ठल गाभारा , रुक्मिणी माता गाभारा , चौखांबी , सोळखांबी या ठिकाणी द्राक्षे आणि त्याच्या पानांची आकर्षक सजावट केली . (photo credit: श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर)