-
घरी काही खास कार्यक्रम असेल किंवा बाहेर लग्न, ऑफिसची पार्टी अथवा खास कार्यक्रम असेल तर मुलं आणि पुरुष सुट घालून जाणं पसंत करतात.
-
ऑफिसमध्ये महत्वाची मीटिंग असेल तरी सूट घालण्यास प्राधान्य दिलं जातं.
-
आजकाल फक्त मुलंच नाही तर महिला आणि मुलीदेखील मोठ्या प्रमाणात सूट घालून दिसतात.
-
सूट घातल्याने समोरच्यावर एक वेगळीच छाप पडते आणि आत्मविश्वास देखील वाढतो.
-
या सुटमध्ये एक कॉमन गोष्ट आहे, ती तुम्ही कधी नोटीस केलीये का?
-
ती म्हणजे या सुटच्या बाहीवर असलेले चार बटण.
-
होय. बहुतांशी सर्वच सुटच्या बाहीवर चार बटण असतात.
-
तर, बाहीवर चार बटणंच का असतात, हे आपण जाणून घेऊयात.
-
बाहीवरच्या या चार बटणांमागे दोन रंजक कथा आहेत. त्यातली पहिली लष्कराशी संबंधीत आहे.
-
त्यातली पहिली अशी की, ब्लेजरची सुरुवात ही राणी एलिझाबेथ प्रथम आणि नेपोलियन या राजेशाही व्यक्तींनी सर्वप्रथम सुरू केली होती.
-
या सूटच्या बाहीवर चार बटण ठेवल्यास सैनिक बाहीला नाक किंवा तोंड पुसणार नाही, असं त्यांचं माननं होतं.
-
कारण नाक किंवा तोंड बाहीला पुसल्यास ती घाण दिसेल.
-
शिवाय अशी घाण बाही पाहिल्याने सैनिकांना बघून कोणी घाबरणार नाही, असंही त्यांना वाटायचं.
-
म्हणून त्यांनी सूटच्या बाहीवर चार बटणा ठेवण्यास सांगितलं, असं म्हटलं जातं.
-
तर, दुसरं कारण असं की, आधीच्या काळात कोट किंवा सुट हा पुरुषांचा दैनंदिन पोशाख होता.
-
आतासारखं ऑफिसमध्ये किंवा डेटवर जाण्यासाठी नाही, तर प्रत्येक ऋतू आणि प्रत्येक परिस्थितीत पुरुष कोट घालायचे.
-
आता या कोटची बाही जर घट्ट असेल आणि काही कष्टाचं काम करायचं असेल तर अडचणी यायच्या आणि तो कोट काढावा लागायचा.
-
परंतु त्या काळी कोट काढणं ही असभ्यता मानली जायची.
-
त्यामुळे कोटच्या बाहीवर असलेल्या या बटण उघडल्या की ते सैल व्हायचं आणि काम करताना कोणतीच अडचण यायची नाही.
-
आता बदलत्या फॅशननुसार अनेक सुटवर फक्त बटण लावलेले असतात, जे उघडता येत नाही. परंतु त्या काळी सर्व गोष्टींचा विचार करून हे कोट शिवले जायचे.
-
तर, ही आहे कोटवर चार बटण असण्यामागची कथा (सर्व फोटो – Pixel आणि Pixabay वरून साभार)

Pune Swargate Rape Case Live Updates : पुणे बलात्कार प्रकरणानंतर परिवहन मंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय; म्हणाले, “१५ एप्रिलपर्यंत…”