-
आजकाल लोक त्यांच्या आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत. लोक आता निरोगी खाण्यावर विश्वास ठेवतात. पण असं असलं तरी अनेक लहान सवयी आहेत, ज्यामुळे ऑस्टियोपोरोसिस सारख्या हाडांशी संबंधित समस्यांचा धोका वाढू शकतो. हाडे कमकुवत होऊ शकतात. स्त्रिया या आजाराला अधिक बळी पडतात कारण त्यांच्यात पुरुषांपेक्षा कमी हाडे असतात. (Photo- Pixabay)
-
सिगारेटचं व्यसन फुफ्फुसाचे नुकसान करण्यासोबतच हाडांनाही कमकुवत करते. धूम्रपानामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढू शकतो असे अनेक अभ्यासातून पुढे आले आहे. (Photo- Pixabay)
-
अल्कोहोल आणि सोडा प्यायल्याने हाडे कमकुवत होतात. जास्त अल्कोहोल हाडांसाठी आवश्यक हार्मोन्सच्या उत्पादनावर परिणाम करते. कार्बोनेटेड पेये प्यायल्याने हाडांची घनताही कमी होते. (Photo- Pixabay)
-
तुमचा आळस हाडे कमकुवत करण्यास कारणीभूत ठरू शकतो. शारीरिक हालचाल कमी झाल्याने हाडे नाजूक होतात. (Photo- Pixabay)
-
अनेक लोक एकाच वेळी अनेक किलो वजन कमी करतात, अशा परिस्थितीत ते हानिकारक ठरू शकते. अभ्यासानुसार १८.५ पेक्षा कमी बॉडी मास इंडेक्समुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढू शकतो. (Photo- Pixabay)
-
झोपेचा तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. स्लीप एपनियामुळे हाडांची समस्या उद्भवू शकते, असे अनेक अहवाल सांगतात. (Photo- Pixabay)
-
व्यस्त जीवनात उन्हात बसण्यासाठी वेळ काढणे अनेकांसाठी कठीण असते. परंतु सूर्यप्रकाश आपल्या हाडांसाठी आवश्यक आहे कारण ते तुम्हाला व्हिटॅमिन डी वाढवते. व्हिटॅमिन डीमुळे आपली हाडे मजबूत होतात. (Photo- Pixabay)
-
हाडे मजबूत करण्यासाठी, आपण शारीरिक हालचालींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, जसे की चालणे, जॉगिंग, चढणे यासारखा व्यायाम करणं गरजेचं आहे. (Photo- Pixabay)
-
निरोगी हाडांसाठी, कॅल्शियम समृद्ध असलेले पदार्थ खा, जसे की डेअरी उत्पादने, बदाम, ब्रोकोली, केळं, सोया देखील समाविष्ट करू शकतात. (Photo- Pixabay)
Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा