त्वचा आणि केसांसोबतच नखांना देखील सुंदर ठेवले जाते. पण अनेक वेळा नखांची काळजी न घेतल्याने ते पिवळे आणि निर्जीव दिसू लागतात, ज्यामुळे हात आणि पायांचे सौंदर्य तर कमी होतेच पण तुमच्या व्यक्तिमत्त्वावरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत तुमच्या त्वचेप्रमाणेच नखांच्या सौंदर्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हाला ही घरच्या घरी नखांना चमकदार आणि गुलाबी करण्यासाठी ५ सोपे उपाय सांगत आहोत. चला तर मग जाणून घेऊयात….
-
ऑलिव्ह ऑईल आणि बदाम: एका वाटीत थोडे ऑलिव्ह तेल घ्या आणि कोमट करा. नंतर त्यात दोन-तीन बदाम पावडर मिसळा आणि या मिश्रणाने नखांना काही वेळ मसाज करा. नंतर स्वच्छ कापडाने पुसून टाका.(photo credit: jansatta)
-
पांढरे व्हिनेगर: नखे चमकदार करण्यासाठी कापसात थोडे पांढरे व्हिनेगर घेऊन हलक्या हातांनी नखांवर हलक्या हाताने चोळा. दहा मिनिटांनंतर तुमचे नखे चमकतील. (photo credit: indian express)
-
बेकिंग सोडा: एका भांड्यात एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात अर्ध्या लिंबाचा रस मिसळा. यानंतर, हे मिश्रण नखांवर लावा आणि पाच मिनिटे राहू द्या, नंतर कोमट पाण्याने नखे स्वच्छ करा.(photo credit: jansatta)
-
शॅम्पू आणि लिंबू: एका मोठ्या भांड्यामध्ये कोमट पाणी घेऊन त्यात एक लिंबाचा रस पिळून घ्या. नंतर त्यात एक छोटे पॅकेट शॅम्पू देखील मिसळा. यानंतर काही वेळ या मिश्रणात नखे बुडवून ठेवा आणि नंतर साध्या पाण्याने स्वच्छ करा. याने तुमची नखे चमकदार दिसतील.(photo credit: indian express)
-
पांढरी टूथपेस्ट: कोणतीही पांढरी टूथपेस्ट घ्या आणि ती तुमच्या नखांवर लावा. यानंतर नखांना हलक्या हातांनी पाच मिनिटे मसाज करा आणि नंतर कोमट पाण्याने धुवून मॉइश्चरायझर लावा.( photo credit: jansatta)