-
हस्तरेखा शास्त्रात नखांचे महत्त्व सांगण्यात आले आहे. खरंतर, नखांच्या आकारावरूनही व्यक्तीचा स्वभाव आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाबाबत जाणून घेता येऊ शकते.
-
नखांच्या रचनेवरून भविष्याबाबतही बरेच काही जाणून घेता येते. हस्तरेखा शास्त्रानुसार नखांच्या खास रचनेसोबत नशिबाचे वेगळेच कनेक्शन असते.
-
लांब आणि रुंद नखे : हस्तरेषा शास्त्रानुसार अशी नखं असणारे लोक प्रेमाने परिपूर्ण असतात. तसेच ते खूप उत्साही असतात.
-
असे लोक खूप सर्जनशील आणि कल्पक असतात. विपरीत परिस्थितीतही ते तग धरून राहतात.
-
रुंद नखे : अशी नखं असलेले लोक खूप मोकळ्या मनाचे असतात. तसेच, ते कोणत्याही कामासाठी नशिबावर अवलंबून राहत नाहीत.
-
अनेकदा ते त्यांच्या बुद्धिमत्तेने काम करतात आणि ते कामात नेहमी अव्वल असतात.
-
अंडाकृती किंवा गोलाकार नखे : अशी नखं असलेल्या लोकांना त्यांच्या घरात जास्त वेळ राहणे आवडते.
-
असे असले तरीही ते खूप सामाजिक देखील असतात. अशा लोकांचे संभाषण कौशल्य खूप चांगले असते. याशिवाय ते लोकांमध्ये सहज मिसळतात.
-
चौकोनी नखे : असे लोक शांत आणि सहनशील असतात. ते नातेसंबंध गांभीर्याने जपतात.
-
यासोबतच असे लोक काम आणि पैशाच्या बाबतीतही भाग्यवान सिद्ध होतात. याशिवाय त्यांच्यात नेतृत्व क्षमताही आहे.
-
टोकदार नखे : अशी नखं असलेले लोक ध्येयाच्या दिशेने समर्पित असतात. त्यांना कोणतेही काम मिळाले तरी ते पूर्ण निष्ठेने करतात.
-
तसेच, अशा लोकांचा कधीकधी संयम सुटतो. त्यामुळे अनेकदा त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.
-
(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. Photo : Pexels)

हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”