-
घरातील अपरिहार्य घटक म्हणजे लिव्हिंग रूममधील सोफा.
-
आपल्याही घरात हटके आणि स्टायलिश सोफा असावा असं प्रत्येकालाच वाटतं.
-
लिव्हिंग रूममधील जागा, इंटिरिअरचे बजेट यानुसार प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार सोफा सेटची निवड करतो.
-
टीव्ही बघताना, रिकाम्या वेळेत किंवा पाहुण्यांसाठी आरामदायक सोफा आकर्षणाचे केंद्रबिंदू तर ठरतोच शिवाय घराची शोभा देखील वाढवतो.
-
एल आकाराचा सोफा, सोफा कम बेड असे सोफ्याचे विविध प्रकार आहेत.
-
पण हा सोफा घरात कोणत्या दिशेला ठेवला आहे यावर देखील घरातील आनंद आणि सुख-समृद्धीचं रहस्य दडलेलं आहे.
-
सर्वसाधारणपणे लिव्हिंग रूममधील टीव्हीच्या विरुद्ध दिशेस सोफा सेट लावला जातो.
-
परंतु घर किंवा घराचा दरवाजा कोणत्या दिशेला आहे यावरून सोफा सेट कुठे असावा, हे ठरवलं जातं.
-
वास्तुशास्त्रानुसार, जर तुमचं घर सूर्याच्या उगवत्या म्हणजेच पूर्व दिशेला असेल तर लिव्हिंग रूममधील सोफा दक्षिण, पश्चिम किंवा नैऋत्य दिशेला असावा.
-
घराचा दरवाजा पश्चिम दिशेला असेल तर सोफा नैऋत्य दिशेस ठेवावा.
-
जर घर उत्तर दिशेला असेल तर सोफा पश्चिम किंवा नैऋत्य दिशेच्या कोपऱ्यात असावा.
-
याशिवाय जर अन्य कोणत्या दिशेला घराचा दरवाजा असेल तर उत्तर आणि ईशान्य दिशेला सोफा सेट लावू नये.
-
उत्तर आणि ईशान्य दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेस सोफा ठेवावा.
-
वरील सर्व माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.
-
(सर्व फोटो : Pexels)

“असा असतो मराठी मुलींचा दणका”, ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…