-
आजकाल सर्वांकडे मोबाईल फोन्स आहेत. एकप्रकारे मोबाईल आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनला आहे.
-
याच्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनातील कित्येक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. पण या अनोख्या तंत्रज्ञानाचे काही तोटेही आहेत.
-
कामासाठी किंवा करमणुकीसाठी आपण मोबाईलचा सतत वापर करत असल्याने लहान मुलेही फोन पाहिल्यानंतर तो वापरण्याचा हट्ट करू लागतात.
-
अनेकवेळा पालक इच्छा नसतानाही मुलांच्या हातात मोबाईल देतात, हळूहळू मुलांनाही स्मार्टफोनचे व्यसन जडते आणि ते दिवसभर या गॅजेटला चिकटून राहतात.
-
बऱ्याचदा मुलांना जेवतानाही फोन हवा असतो. फोन न पाहता ते जेवणही सुरू करत नाहीत, हे पाहून पालकांना आपली चूक कळते, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.
-
परंतु असे काही मार्ग आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही मुलांना या व्यसनापासून मुक्त करू शकता.
-
इंटरनेटच्या युगात पुस्तकांपासून दूर राहणे सामान्य झाले आहे. मुलांनाही आजकाल पुस्तके वाचणे आवडत नाही कारण पालकच दिवसभर मोबाईलला चिकटलेले असतात.
-
तुम्ही स्वतः मुलांसमोर पुस्तक वाचायला सुरुवात केली तर मुलंही नक्कल करून पुस्तक वाचू लागतील.
-
जेव्हा ते हे करतील तेव्हा नक्कीच त्यांच्याशी बसून चर्चा करा आणि त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करा.
-
तुम्ही मुलांना निसर्गाच्या जितक्या जवळ आणाल तितके ते मोबाईल फोनपासून दूर होतील.
-
आपल्या जीवनात नैसर्गिक गोष्टींचे महत्त्व काय आहे ते त्यांना सांगा.
-
निसर्गाच्या सौंदर्याची ओळख करून देण्यासाठी त्यांना उद्यान, तलाव किंवा हिल स्टेशन अशा ठिकाणी घेऊन जा.
-
कोरोना विषाणूच्या साथीनंतर लॉकडाऊनमुळे मुले बराच काळ घरात कैद होती, त्यामुळे त्यांना मोबाईलची सवय झाली होती.
-
या दरम्यान, ऑनलाइन शिक्षणात स्मार्टफोनचा वापर करणे एक सक्ती बनली. यासोबतच मुलांची बाहेर खेळण्याची सवयही सुटली आहे.
-
अशा परिस्थितीत त्यांना मैदानी खेळांसाठी प्रोत्साहन देणे ही पालकांची जबाबदारी आहे, जेणेकरून त्यांचे लक्ष मोबाइलवरून हटवता येईल.
-
एवढ्या प्रयत्नांनंतरही जर मुल मोबाईल फोन वापरणे टाळत नसेल तर कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. (वरील सर्व फोटो : Pexels)
-
मुलांना फोन वापरता येणार नाही म्हणून मोबाईलमध्ये पासवर्ड सेट करणे ठीक राहील. (Photo : Pixabay)

Hanuman Jayanti 2025 : हनुमानाच्या ‘या’ आहेत चार प्रिय राशी; कमी वयात होतात श्रीमंत, संकटमोचनच्या कृपेने अडचणी होतात दूर