-
एप्रिल महिन्यात अनेक ग्रह राशी बदलणार आहेत. या महिन्यात सर्व नऊ राशीतील ग्रहांचे परिवर्तन होणार आहे.
-
ज्योतिष शास्त्रानुसार, शनी आणि राहु-केतु हे ग्रह एप्रिल महिन्यात राशी बदलणार आहेत. या ग्रह परिवर्तनाचा लाभ कोणत्या राशींना होणार आहे, ते जाणून घेऊया.
-
वृषभ : राहु ग्रह सध्या वृषभ राशीत आहे. एप्रिल महिन्यात राहु मेष राशीत प्रवेश करणार आहे.
-
त्यामुळे वृषभ राशींच्या लोकांसाठी हा महिना लाभदायक ठरणार आहे.
-
या राशीच्या लोकांना कामात प्रगतीसोबतच धनलाभाचा देखील योग आहे.
-
सिंह : एप्रिल महिना सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. वृषभ राशीप्रमाणेच या राशीच्या लोकांनाही धनलाभाचा योग आहे.
-
सिंह राशीतील लोकांना नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्यांसोबतच बढती मिळण्याची शक्यता आहे.
-
वृश्चिक : सध्या वृश्चिक राशीत असलेला केतु ग्रह एप्रिल महिन्यात दुसऱ्या राशीत प्रवेश करेल.त्यामुळे या राशीच्या लोकांची संकटातून सुटका होऊन मानसिक आरोग्य लाभेल.
-
कामाच्या ठिकाणी प्रगती, धनलाभ तसेच जोडीदाराशी संबंध दृढ होतील.
-
धनु : शनी सध्या धनु राशीत असल्यामुळे या राशीच्या लोकांना कष्टांचा सामना करावा लागतोय. एप्रिल महिन्यात शनी ग्रह दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे.
-
त्यामुळे धनु राशीच्या लोकांना दीर्घकाळ सुरु असलेल्या प्रयत्नांत यश तसेच धनलाभ होईल.
-
वरील सर्व माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.

आता दु:खाचे दिवस संपणार! चैत्र पौर्णिमेच्या आधी ‘या’ राशींच्या दारी पैसा येईल चालून? रखडलेली कामे होऊ शकतात पूर्ण