-
देशातील महागाई, रोज वाढणारे पेट्रोलचे दर यामुळे नागरिक त्रस्त आहेत. परंतु जगात असेही काही देश आहेत जिथे जनजीवन भारतापेक्षाही महागडे आहे. (फोटो : Pexels)
-
इतकंच नाही तर यातील बऱ्याचशा देशांमध्ये दैनंदिन जीवनातील वस्तूही बाहेरच्या देशातून मागवल्या जातात. (फोटो : Pexels)
-
जगातील या सगळ्यात महागड्या देशांबद्दल जाणून घेऊया. (फोटो : Pexels)
-
स्वित्झर्लंड : पर्यटनासाठी आणि निसर्ग सौंदर्यासाठी स्वित्झर्लंड हा देश प्रसिद्ध आहे. (फोटो : Pexels)
-
नवीन दाम्पत्यांची फिरायला जाण्यासाठी स्वित्झर्लंडला पसंती असते. (फोटो : Pexels)
-
परंतु स्वित्झर्लंडला जगातील सगळ्यात महागडा देश म्हणून घोषित करण्यात आलं आहे. (फोटो : Pexels)
-
या देशात स्वतःच्या घरात राहण्यासाठी देखील टॅक्स स्वरूपात पैसे मोजावे लागतात. (फोटो : Pexels)
-
येथे दैनंदिन जीवनातील वस्तूंच्या किंमतीही गगनाला भिडलेल्या आहेत. (फोटो : Pexels)
-
आइसलॅण्ड : निसर्गप्रेमींसाठी आइसलॅण्ड हे उत्तम पर्यटनस्थळ आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
परंतु इथे रोजच्या जीवनातील वस्तूंपेक्षा घर घेणं सोपं आहे, असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. (फोटो : Pexels)
-
आइसलॅण्डमध्ये दैनंदिन जीवनातील बहुतांश वस्तूंची दुसऱ्या देशातून आयात करावी लागते. (फोटो : Pexels)
-
त्यामुळे या देशात किराणा माल आणि खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या किंमतीचे दर चक्रावून सोडणारे आहेत. (फोटो : Pexels)
-
बरमुडा : येथील निसर्गसौंदर्य डोळे दिपवून टाकणारं आहे. (फोटो : Pexels)
-
या देशाची राजधानी असलेलं हॅमिल्टन हे शहर सगळ्यात महागड्या शहरांपैकी एक आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
अमेरिकेच्या तुलनेत बरमुडा देशातील कॉस्ट ऑफ लिव्हिंगचा खर्च जास्त आहे. (फोटो : Pexels)
-
डेन्मार्क : रेस्तारॉंसाठी हा देश प्रसिद्ध आहे. येथील लोकांचे राहणीमान देखील उच्च दर्जाचे आहे. (फोटो : Pexels)
-
परंतु यासाठी त्यांना तेवढे पैसेही मोजावे लागतात. दोन लोकांच्या जेवणासाठी इथे तब्बल ६ हजार ८०० रुपये मोजावे लागतात. (फोटो : Pexels)
-
नॉर्वे : निसर्गसौंदर्य आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला देश म्हणजे नॉर्वे. (फोटो : Pexels)
-
परंतु जीवनावश्यक खर्चासाठी येथील नागरिकांना खूप पैसे मोजावे लागतात. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
या देशात खाण्यापिण्याच्या वस्तूंवर १५ टक्के टॅक्स आकारला जातो. (फोटो : Pexels)
-
त्यामुळे टॅक्स चुकवण्यासाठी येथील नागरिक चक्क दुसऱ्या देशातून वस्तूंची खरेदी करतात. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

“असा असतो मराठी मुलींचा दणका”, ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…