-
तुमच्याकडे अनेक कागदपत्रे आहेत जी जवळजवळ प्रत्येक कामासाठी आवश्यक असतात. ज्यामध्ये आधी आधार कार्ड आणि नंतर पॅन कार्डचा नंबर लागतो.
-
बँकेत खाते उघडण्यासाठी किंवा आर्थिक व्यवहार करण्यासाठी असो अशा अनेक कामांमध्ये पॅन कार्ड आवश्यक आहे.
-
मात्र काही काळापासून अशा तक्रारीही समोर येत आहेत, ज्यामध्ये लोकांच्या पॅनकार्डचा गैरवापर केला गेला आहे.
-
कोणीतरी दुसर्या व्यक्तीच्या पॅन कार्डवर कर्ज घेतले किंवा अन्य गोष्टीसाठी वापर केला. अशा घटना तुम्ही वाचल्या असतील.
-
अशा परिस्थितीत तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर झाला आहे की नाही हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरते.
-
चला तर मग जाणून घ्या की तुमच्या पॅनचा इतिहास कसा तपासायचा आणि तुमचे पॅन कार्ड कुठे वापरले आहे हे कसे शोधायचे.
-
बँकेत खाते उघडण्यासाठी, शेअर मार्केटमधील ट्रेडिंगसाठी आयकर रिटर्न भरणे, कर्ज घेणे, मालमत्ता खरेदी करण्यासाठी, सोने खरेदी करणे इत्यादी कामांसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे.
-
तुमच्या पॅन कार्डचा इतिहास तपासल्यावर, तुम्हाला कळू शकते की कोणीतरी फसवणुकीने कर्ज घेतले आहे का. यासाठी तुम्हाला प्रथम https://www.cibil.com/ वर जावे लागेल.
-
तुम्हाला त्या वेबसाईटवर ‘गेट योर सिबिल स्कोर’ (‘Get Your CIBIL Score’) या पर्यायावर क्लिक करावे लागेल. नंतर येथे असलेल्या अनेक सब्सक्रिप्शन योजनांपैकी एक निवडा.
-
त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, जन्मतारीख आणि ईमेल आयडी सारखे इतर तपशील भरा.
-
त्यानंतर लॉगिनसाठी पासवर्ड तयार करा. तसेच आयटी प्रकारात ‘इन्कम टॅक्स आयडी’ निवडा.
-
आता तुम्हाला तुमचा पॅन कार्ड क्रमांक टाकावा लागेल आणि ‘Verify Your Identity’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
-
पुढे विनंती केलेली माहिती आणि शुल्क भरा आणि तुमचे खाते OTP किंवा ईमेल आयडीने लॉग इन करा.
-
आता तुमच्या समोर एक फॉर्म येईल, जो भरून तुम्ही तुमच्या खात्यावर किती कर्ज आहे हे जाणून घेऊ शकता.
-
जर तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर झाला असेल तर तुम्ही आयटी विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://incometax.intalenetglobal.com/pan/pan.asp वर जाऊन तक्रार नोंदवू शकता. येथून तुम्हाला मदत केली जाईलं. (सर्व फोटो: Indian Express)

“असा असतो मराठी मुलींचा दणका”, ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…