-
उन्हाळ्यात सुखावणारी आणि मनाला आनंद देणारी गोष्ट म्हणजे आंबा. अगदी लहान मुलांपासून ते आजी-आजोबांपर्यंत आंबा सगळ्यांनाच आवडतो.
-
क्वचितच कोणीतरी असेल ज्याला आंबा आवडत नसेल. सगळेच उन्हाळ्यात आंब्यावर ताव मारताना दिसतात.
-
परंतु आंबा खाल्ल्यानंतर लगेचच काही पदार्थ खाणे टाळले पाहिजे.
-
अन्यथा पोटदुखी, मळमळ अशा समस्या उद्भवू शकतात.
-
पाणी : आंबा खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणे टाळा. यामुळे पोटदुखी, अॅसिडिटी सारख्या समस्या उद्भवतात.
-
आंबा खाल्ल्यानंतर किमान अर्धा तास तरी पाणी पिऊ नका.
-
कारले : आंबा खाल्ल्यानंतर चुकूनही कारले खाऊ नका. त्यामुळे उलट्या, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशा समस्या उद्भवू शकतात.
-
मसाल्याचे पदार्थ : तिखट किंवा मसाल्याच्या पदार्थांचे आंबा खाल्ल्यानंतर सेवन करणे हानिकारक ठरू शकते.
-
यामुळे त्वचेच्या समस्या, अॅलर्जी होऊ शकते.
-
दही : आंबा खाल्ल्यानंतर दही खाऊ नका. यामुळे त्वचेची समस्या उद्भवू शकते.
-
कोल्ड ड्रिंक्स : आंबा खाल्ल्यानंतर कोल्ड ड्रिंक्सचे सेवन केल्यास रक्तातील साखर वाढते.
-
त्यामुळे चुकूनही आंबा खाल्ल्यानंतर कोल्ड ड्रिंक्सचे सेवन करू नका. (सर्व फोटो : unsplash)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख