-
कोणीही आजारी पडलं की आपण त्यांच्यासाठी फळं घेऊन जातो. कारण आपण सर्वच जाणतो की कोणत्याही आजाराशी लढण्यासाठी फळे महत्त्वाची भूमिका बजावतात.
-
चुकीची जीवनशैली आणि आहारातील पौष्टिक घटकांची कमतरता यामुळे अनेकजण अनेक आजारांना बळी पडतात. मधुमेह असाच एक आजार आहे.
-
अशीच काही फळे आहेत जी मधुमेहासाठी अतिशय फायदेशीर आहेत.
-
आज आपण जाणून घेऊया अशी कोणती फळे आहेत जी मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतात.
-
पेरू : पेरू खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तसेच पेरूमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी, फॉलेट, पोटॅशियम यासारखे अनेक पोषक तत्त्व असतात, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहेत.
-
पेरूमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, जो रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो.
-
जांभूळ : जांभूळ मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर आहेत. जांभळाच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.
-
सफरचंद : मधुमेहाच्या रुग्णांसाठी सफरचंदही खूप फायदेशीर आहे. वास्तविक, त्यात विरघळणारे आणि न विरघळणारे फायबर असते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
-
किवी : सर्वांना माहित आहे की, किवी खाण्याचे अनेक फायदे आहेत. मधुमेहाच्या रुग्णांनाही हे खाल्ल्याने फायदा होऊ शकतो.
-
किवीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन-सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
-
संत्री : मधुमेही रुग्णांसाठी संत्रीही रामबाण उपाय आहे. संत्र्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, फोलेट आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, जे मधुमेहापासून आराम देण्याचे काम करतात.
-
(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या.)
-
(सर्व फोटो : Pixabay)

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO