-
प्राणीप्रेमी असलेल्यांच्या घरात एक तरी पाळीव प्राणी असतोच.
-
काही जण आवड म्हणून तर काही प्रेमापोटी पक्षी आणि प्राण्यांना घरी पाळतात.
-
प्राण्यांची सेवा करणे, त्यांना खाऊपिऊ घालणे हे पुण्याचे काम मानले जाते.
-
पण या प्राण्यांमुळे तुमचं नशीब उजळू शकते असं सांगितलं तर यावर तुमचा विश्वास बसेल का?
-
वास्तुशास्त्रानुसार, काही प्राण्यांच्या घरात असल्याने घरातील व्यक्तींना यश मिळते. तसेच घरात सुख-समृद्धीदेखील नांदते.
-
कासव : कासव घरात असणे हे शुभ मानले जाते. यामुळे घरात वैभव, ऐश्वर्य येते. तसेच घरातील व्यक्तींना प्रत्येक कामात यश मिळते.
-
मासे : घराची शोभा वाढवण्यासाठी अनेक जण घरात फिशटँक ठेवतात. पण यामागील वास्तुशास्त्र तुम्हाला माहित आहे का?
-
यामुळे घरात सकारात्मकता आणि सौभाग्य नांदते. सोनेरी माश्यासोबत काळ्या रंगाचा मासा फिशटँकमध्ये ठेवल्यास घरात पैसा खेळता राहतो.
-
ससा : इवलासा कापसासारखा दिसणारा हा प्राणी घरातील नकारात्मकता दूर करतो. लहान मुलांना नजर लागण्यापासून वाचवतो तर अनेकांसाठी ससा भाग्यवान ठरतो.
-
कुत्रा : आजकाल अनेक जण घरात कुत्रा पाळतात. इमानदारीसाठी ओळखला जाणारा कुत्रा काळभैरव देवाचा सेवक आहे. त्यामुळे कुत्र्याची सेवा केल्याने अशुभ मानल्या जाणाऱ्या ग्रहांचीदेखील कृपा होते.
-
घोडा : या प्राण्याला घरात पाळणे शक्य नसले तरी त्याचा फोटो घरात जरुर लावा. त्यामुळे तुम्हाला नक्की यश मिळेल.
-
वरील सर्व माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.(सर्व फोटो : Pixabay)

MI vs RCB: RCBचा मुंबई इंडियन्सवर ऐतिहासिक विजय, दिल्लीचा संघ थेट फायनलमध्ये; MIचा एलिमिनेटर सामना कोणाविरूद्ध?