-
आरोग्य तज्ञ दिवसातून ३ ते ४ लीटर पाणी पिण्याचा सल्ला देतात. परंतु, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जेवताना पाणी पिणे टाळायला हवे. (Photo : Pexels)
-
ज्या व्यक्ती जेवताना किंवा जेवल्यावर लगेचच पाणी पितात त्यांना आरोग्यविषयक अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. (Photo : Pexels)
-
आरोग्य तज्ञांनुसार खाल्लेले अन्न पचायला जवळपास २ तास लागतात. यादरम्यान पाणी प्यायल्याने पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. (Photo : Pexels)
-
म्हणूनच जेवल्यावर किमान ४५ ते ५० मिनिटांनंतर पाणी प्यायला हवे. तसेच, जेवायच्या अर्धा तास आधी पाणी प्यावे. (Photo : Pexels)
-
योग्य वेळी पाणी प्यायचे फायदे कोणते हे जाणून घेऊया. (Photo : Pexels)
-
जेवल्यानंतर एका तासाने पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहते. (Photo : Pexels)
-
योग्य वेळी पाणी प्यायल्याने पचनक्रिया बरोबर आणि मजबूत राहते. (Photo : Freepik)
-
पोटात गॅस आणि अॅसिडिटीची समस्या होणार नाही. (Photo : Freepik)
-
शरीर अन्नातील पोषक तत्व चांगल्या प्रकारे शोषून घेते. (Photo : Pexels)
-
योग्य वेळी पाणी प्यायल्याने चांगली झोप येण्यास मदत होते. (Photo : Pexels)
-
जेवल्यानंतर लगेचच पाणी पिण्याचे तोटे कोणते हे जाणून घेऊया. (Photo : Pexels)
-
लठ्ठपणा जाणवू शकतो. (Photo : Pexels)
-
पचनासंबंधी तक्रारी जाणवतात. (Photo : Freepik)
-
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची समस्या जाणवू शकते. (Photo : Pexels)
-
पोटात गॅसची समस्या निर्माण होते. (Photo : Pexels)
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photo : Pexels)

Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा