HEALTH : हे ५ खाद्यपदार्थ तुम्हाला उन्हाळ्यात थंडावा देतील
उन्हाळा सुरू असून पाऱ्याने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. तर काही ठिकाणी ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. पारा दिवसेंदिवस वाढत असताना, तीव्र सूर्यप्रकाश शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो. आपली शरीरातली उर्जा वाढवण्यासाठी ते पुरेसे असले तरी ते शरीरावर कायमचे हानिकारक दुष्परिणाम देखील सोडू शकतात.
टरबूज एक हंगामी उन्हाळी फळ उपयुक्त ठरतं. त्यात ९१.४५ % पाणी असल्यामुळे ते तुमच्या शरीराची पाण्याची गरज पूर्ण करण्यास मदत करते. तसेच, अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असल्यामुळे टरबूज आपल्याला एक अद्भुत थंडावा देतं. ते खायला भरपूर रसदार आणि चवदार आहे आणि बहुतेक मुलांना ते खायला आवडते. (Image Source: Pixabay)दही हे केवळ स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पदार्थच नाही तर शरीराला कूलिंग इफेक्ट देखील देतं. मसालेदार ताक किंवा गोड लस्सी तयार करता येतं. तुम्ही रायता देखील बनवू शकता आणि ते तुमच्या जेवणासोबत खाऊ शकता. दही खाण्याचा दुसरा पर्याय म्हणजे त्यात हंगामी फळे घालून किंवा लिप स्माकिंग स्मूदी सुद्धा बनवून खाता येतं. (Image Source: Pixabay)नारळ पाणी हे उन्हाळ्यातील सर्वोत्तम पेय आहे. एरेटेड ड्रिंक पिण्याऐवजी नारळपाणी प्या. नारळाच्या पाण्यात आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषक घटक असतात. त्यात कूलिंग इफेक्ट्स आहेत जे तुम्हाला उष्ण हवामानाशी लढण्यास मदत करतात. अभ्यासात असेही दिसून आले आहे की नारळाचे पाणी नियमितपणे पिल्याने अनेक रोगांपासून संरक्षण होते. (Image Source: Pixabay)आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा वर्षभर समावेश केल्याने तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात आणि त्यांना आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट करणे देखील फायदेशीर आहे. कारण हिरव्या पालेभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. या भाज्या जास्त शिजवू नका. कारण त्यामुळे त्यातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. (Image Source: Pixabay)लिंबू पाणी जे तुम्हाला कुठेही सहज उपलब्ध होऊन जातं. हे उन्हाळ्यासाठी आणखी एक ताजेतवाने पेय आहे. एक ग्लास लिंबू पाणी आरोग्यासाठी अनेक फायदे देते. तुम्ही गोड लिंबू पाणी घेऊ शकता, त्याची चव वाढवण्यासाठी त्यात मीठ, चिमूटभर जिरेपूड घालू शकता. लिंबू पाणी तुम्हाला दिवसभर थंड आणि ताजेतवाने ठेवते. (Image Source: Pixabay)