-
जर तुम्हाला लिंबाच्या पानांचा क्लिंजर म्हणून वापर करायचा असेल, तर तुम्हाला लिंबाच्या पानांचा अर्क घ्या आणि त्यात एक चमचा कोरफड जेल घाला. तसेच एक चमचा पुदिन्याच्या पानांचा रस घाला. ही पेस्ट कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा आणि कोरड्या कापसाने चेहरा स्वच्छ करा.(फोटो: indian express)
-
कामाचा ताण, आणि थकवा यांचा परिणाम चेहऱ्यावर काळ्या वर्तुळांच्या स्वरूपात दिसून येतो. या समस्येवर मात करण्यासाठी लिंबाच्या पानांची मदत घ्या. (फोटो: indian express)
-
लिंबाप्रमाणेच त्याची पाने देखील त्वचेवरील पिंपल्स दूर करण्यासाठी प्रभावी मानली जातात. पिंपल्स दूर करण्यासाठी तुम्हाला लिंबाच्या पानांचा फेस पॅक बनवावा लागेल. एका भांड्यात दोन ते तीन चमचे मुलतानी माती घ्या आणि त्यात लिंबाच्या पानांचा अर्क आणि मध मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून कोरडी होऊ द्या. काही वेळाने थंड पाण्याने स्वच्छ धुवा.(फोटो: indian express)
-
मऊ त्वचेसाठी लिंबाच्या पानांपासून बनवलेले लोशन वापरून पहा. खोबरेल तेल घ्या आणि त्यात लिंबाच्या पानांचा अर्क मिसळा आणि चेहरा आणि हातावर लावा. याचा नियमित वापर केल्याने तुमची त्वचा मुलायम होऊ शकते. (फोटो: indian express)
-
एका भांड्यात लिंबाच्या पानांची पेस्ट ठेवा आणि त्यात दोन चमचे मध घाला. डोळ्याभोवती लावा आणि नंतर थंड पाण्याने धुवा.(फोटो: indian express)
-
उष्णतेमुळे त्वचेचा टोन हरवला आहे, अशा स्थितीत त्वचा उजळण्यासाठी तुम्ही लिंबाच्या पानांची मदत घेऊ शकता. एक चमचा लिंबाच्या पानाच्या अर्कामध्ये थोडी हळद मिसळून चेहऱ्यावर लावा. हे १० मिनिट असेच चेहर्यावर राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा. (फोटो: indian express)

लोकांच्या जीवाशी खेळ! कलिंगड विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल