-
जर तुम्हाला उन्हाळ्यातही प्रवास करायला आवडत असेल तर पूर्ण तयारीनिशी बाहेर पडणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. (फोटो: indian express)
-
काही वेळा लोकं काही महत्त्वाच्या गोष्टी घरी विसरून जातात आणि वाटेत अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे उन्हाळयात प्रवासात करताना या गोष्टी सोबत ठेवा. (फोटो: indian express)
-
उन्हाळा ऋतूतील उष्णतेमुळेही त्वचा टॅन होते. तसेच उन्हाळाच्या ऋतुत आपण घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावणे फार महत्वाचे आहे. जर तुम्ही सहलीला जात असाल तर नक्कीच बॅगेत सनस्क्रीन ठेवा. (फोटो: indian express)
-
या ऋतूत उष्णतेचा डोळ्यांवरही वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत बॅगेत सनग्लासेस ठेवायला विसरू नका. (फोटो: indian express)
-
सनग्लासेस असण्याचा एक फायदा म्हणजे सनग्लासेस घातल्याने तुम्ही तुमचा लुक आणखी चांगला बनवू शकता. (फोटो: indian express)
-
उन्हाळ्यात प्रवास करताना घाम येणे साहाजिक असते आणि अशा परिस्थितीत घट्ट कपड्यांमुळे तुमच्या अंगावर पुरळ उठणे किंवा जळजळ होऊ शकते. (फोटो: indian express)
-
जर तुम्हाला संपूर्ण प्रवासात त्रास सहन करायचा नसेल तर तुमच्या बॅगेत फक्त कॉटन आणि हलके कपडे घाला.(फोटो: indian express)
-
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी अधिकाधिक पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. (फोटो: indian express)
-
प्रवासात तुम्ही किमान दोन लिटर पाणी सोबत ठेवावे. (फोटो: indian express)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल