-
दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत आहे. (प्रातिनिधिक फोटो)
-
शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि उष्माघात टाळण्यासाठी, आपण आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
शरीरात पाण्याची कमतरता पडू देऊ नका.
-
उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासू शकते, अशा परिस्थितीत तुमचे आरोग्य बिघडू शकते.
-
रोजच्या आहारात तुम्ही काही खास पेयांचे सेवन करणे आवश्यक आहेत.
-
घरच्या घरी ही पेय तुम्ही सहज बनवू शकता.
-
लिंबूपाणी: शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि उष्माघातापासून बचाव करण्यासाठी तुम्ही लिंबूपाणी सेवन करू शकता. लिंबू व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत मानला जातो. हे तुमचे शरीर आतून थंड होण्यास मदत करू शकते.
-
नारळ पाणी : नारळाचे पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. उन्हाळ्याच्या दिवसात नारळ पाण्याचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. दररोज नारळपाणी सेवन केल्याने शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवता येते.
-
लस्सी: दह्यापासून बनवलेले ताक आणि लस्सीमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी१२, झिंक आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. लस्सी हा प्रोबायोटिक्सचा चांगला स्रोत आहे, जो उन्हाळ्यात शरीराला उष्माघातापासून वाचवण्यास मदत करतो.
-
पुदिन्याचे पेय: पुदिना हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. उन्हाळ्यात तुम्ही पुदिन्याचे पेय घेऊ शकता, ते तुम्हाला आतून ताजेतवाने ठेवू शकते आणि उष्माघातापासून तुमचे संरक्षण करण्यास देखील मदत करते.
-
आम पन्ना : उष्माघाताचा सामना करण्यासाठी आम पन्ना हा एक चांगला मार्ग आहे. हा कच्ची कैरी, साखर आणि मसाल्यापासून बनवला जातो. हे पेय उन्हाळ्यात आंब्याच्या मुबलक प्रमाणात असल्यामुळे विशेषतः लोकप्रिय आहे. आम पन्ना हे अँटिऑक्सिडंट्सने परिपूर्ण आहे आणि तुम्हाला आजारी पडण्यापासून वाचवू शकते.
-
कलिंगडाचा ज्यूस : उन्हाळ्याच्या दुपारच्या वेळी कलिंगडाचा ज्यूस फक्त तुमची तहान भागवत नाही तर तुम्हाला हायड्रेट ठेवतो. तुम्हाला थंड ठेवण्यासाठी आणि उष्णतेवर मात करण्यासाठी तुमच्या नाश्त्यामध्ये एक मोठा ग्लास कलिंगडाचा ज्यूस पिणे आवश्यक आहे.
Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित