-
उन्हाळा आला आहे, आणि कडक उष्णतेचा आपल्या शरीरावर परिणाम जाणवू लागला आहे. (प्रातिनिधिक फोटो)
-
लक्षात ठेवण्यासारख्या सर्वात महत्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे हायड्रेटेड राहणे. (फोटो: Freepik)
-
अति घामामुळे आपल्या शरीरातील पाणी, मीठ आणि इतर महत्त्वाची खनिजे उन्हाळ्यात झपाट्याने नष्ट होतात. म्हणून या सिजनमध्ये तुम्हाला हायड्रेटेड राहण्यासाठी आणि ताजेतवाने वाटण्यासाठी, हे काही देसी पेय नक्की ट्राय करा. (फोटो: Freepik
-
आम पन्ना: उष्माघाताचा सामना करण्यासाठी आम पन्ना हा एक चांगला मार्ग आहे. हा कच्ची कैरी, साखर आणि मसाल्यापासून बनवला जातो. हे पेय उन्हाळ्यात आंब्याच्या मुबलक प्रमाणात असल्यामुळे विशेषतः लोकप्रिय आहे. आम पन्ना हे अँटिऑक्सिडंट्सने परिपूर्ण आहे आणि तुम्हाला आजारी पडण्यापासून वाचवू शकते. (फोटो: Freepik
-
जलजीरा: उन्हाळ्यात तिखट, थंडगार जलजीरा कोणाला आवडत नाही? उष्णतेवर मात करण्यासाठी जलजीरा हे एक थंड आणि उत्तम पेय आहे. (फोटो: Freepik)
-
मसाला ताक: ताक, ज्याला बटरमिल्क असेही म्हणतात, हे एक स्वादिष्ट दही-आधारित पेय आहे जे भारतात खूप पसंत केले जाते. ताक हे एक उत्कृष्ट पाचक पेय आहे. (फोटो: Indian Express)
-
सत्तू सरबत: हे बिहारच खास पेय आहे जी उष्ण दिवसातही शरीराला थंड ठेवते. ते बनवण्यासाठी फक्त सत्तू पीठ, साखर आणि पाणी लागते. हे केवळ चवदारच नाही तर ते पोट भरणारे देखील आहे. (फोटो: Indian Express)
-
शिकंजी: काही मिनिटांतच, लिंबू, पाणी, मसाला आणि पुदिन्याच्या ताज्या पानांनी बनवलेले हे पेय आपल्याला चैतन्य आणि फ्रेश करू शकते. याला अजून चविष्ट बनवण्यासाठी जीरा पावडरही त्यात घाला. (Source: Saffron Trail)
-
घरच्या घरी ही पेय तुम्ही सहज बनवू शकता. (प्रातिनिधिक फोटो)

त्या दोघींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! रिक्षात लपून करत होत्या ‘असं’ काही की…, VIDEO पाहून धक्काच बसेल