-
अनेकांना शॉपिंगचा नाद असतो. काहींना विंडो शॉपिंग करायला आवडतं तर काही जण ऑनलाइन शॉपिंगला पसंती दर्शवतात.
-
काही लोकांना ब्रॅण्डेड वस्तूंचा शौक असतो. तर काही जण आवडत्या वस्तू खरेदी करण्यासाठी खूप पैसे खर्च करतात.
-
पण खरेदी करण्याचं हे गणित राशींवर अवलंबून असतं, असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का?
-
ज्योतिषशास्त्रानुसार, सहा राशींच्या लोकांना शॉपिंगचा नाद असतो. यामध्ये कोणत्या राशी आहेत ते पाहूया.
-
वृषभ : या राशीचे लोक शॉपिंगचे शौकीन असतात. असं असलं तरी ते कामाच्या वस्तूंची खरेदी करतात.
-
गरजेच्या नसलेल्या वस्तू विकत घेण्यासाठी वृषभ राशीचे लोक पैसे खर्च करत नाहीत. पुरुषांपेक्षा वृषभ राशीच्या महिला जास्त शॉपिंग करतात.
-
सिंह : शॉपिंग करणे म्हणजे सिंह राशीच्या लोकांसाठी एक सवयीचा भाग आहे.
-
या राशीच्या लोकांना ब्रॅण्डेड वस्तू खरेदी करण्यात जास्त रस असतो. त्यामुळे बऱ्याचदा त्यांच्या खिशाला कात्री देखील लागते.
-
सिंह राशीतील केवळ महिलाच नाही तर पुरुषांनाही शॉपिंगचा नाद असतो.
-
तूळ : तूळ राशीतील लोक लक्झरियस आयुष्य जगणे पसंत करतात. सिंह राशीच्या लोकांप्रमाणेच या राशीच्या लोकांनाही ब्रॅण्डेड वस्तू खरेदी करण्याचा नाद असतो.
-
आवडत्या वस्तू खरेदी करण्यासाठी तूळ राशीचे लोक खूप पैसे खर्च करतात.
-
कुंभ : या राशीच्या लोकांना देखील शॉपिंगचा नाद असतो. कुंभ राशीच्या लोकांना ऑनलाइन शॉपिंग करायला आवडते.
-
इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा या राशीच्या लोकांना शौक असतो.
-
धनू : धनू राशीचे लोक शॉपिंग करताना पैशाचा विचार करत नाहीत. या राशीच्या लोकांना इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, कॉस्मेटिक्स खरेदी करण्याचा नाद असतो.
-
धनू राशीच्या महिला मेकअपच्या सामानावर जास्त पैसे खर्च करतात.
-
मीन : मीन राशीच्या लोकांनाही शॉपिंगचा नाद असतो. पण या राशीचे लोक स्वतःसाठी नाही तर जिवलग, नातेवाईकांसाठी खरेदी करतात.
-
मीन राशीच्या लोकांना आपल्या व्यक्तींना गिफ्ट देण्यासाठी शॉपिंग करणे आवडते.
-
वरील सर्व माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. (सर्व फोटो : Pexels)
Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा