-
उन्हाळ्याच्या दिवसांत तयार होणारे, कलिंगड हे फळ म्हणजे आपल्यासाठी एक वरदान आहे.
-
उन्हाळ्याच्या दिवसांत प्रखर उष्णतेने अंगाची लाही लाही होते, त्या वेळी कलिंगडाच्या सेवनाने शरीराला शीतलता प्राप्त होते आणि अतिघामामुळे निर्माण झालेला थकवा दूर होऊन उत्साह निर्माण होतो.
-
कलिंगड हे अल्कली गुणधर्माचे फळ आहे. त्यामुळे आम्लतेने निर्माण होणाऱ्या आजारांवर ते उपयोगी पडते.
-
उष्णतेने निर्माण होणाऱ्या घामातून शरीरातील जलउत्सर्जन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे शरीरातील खनिजे घामाद्वारे निघून जातात.
-
पर्यायाने अशा वेळी थकवा जाणवतो. त्यावेळी कलिंगड खाल्ल्याने तहान भागते व घामाद्वारे शरीरातील झालेला खनिज द्रव्यांचा ऱ्हास भरून येतो.
-
कलिंगडाच्या बियांचा उपयोग शक्तिवर्धक म्हणून केला जातो. कारण या बियांमध्ये ‘कुम्बोट्रिन’ नावाचा ग्लुकोसाइड घटक असतो. यातील साखर सहज पचून रक्तामध्ये मिसळत असल्याने ते आरोग्यपूर्ण आहे.
-
कलिंगड शक्तिवर्धक, पौष्टिक, दाहशामक, पित्तनाशक आहे. त्याची साल, फळ व बी या तिघांचाही उपयोग केला जातो.
-
मूतखडा झाला असेल तर तो लघवीतून पडून जाण्यासाठी कलिंगडाचा रस सतत काही दिवस द्यावा. आम्लपित्ताचा त्रास होत असेल तर पित्त कमी करण्यासाठी कलिंगड खावे.
-
उन्हातून आल्यानंतर किंवा उष्णतेच्या विकाराने डोकेदुखीचा त्रास होत असेल तर गर काढलेल्या अध्र्या कलिंगडाची टोपी डोक्यात घालावी. डोकेदुखी थांबून शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो.
-
कलिंगडामध्ये टोमॅटोप्रमाणे लायकोपिनचे प्रमाण भरपूर असते. लायकोपिन अॅण्टिऑक्सिटेंट असल्यामुळे कर्करोग दूर ठेवायला उपयुक्त ठरते.
-
कलिंगड खाल्ल्याने त्यामध्ये असणारा चोथा व आद्र्रतेमुळे मलावरोधाची तक्रार कमी होऊन पोट साफ होते.
-
उष्माघातामुळे शरीराची आग होत असेल तर तसेच उष्णतेमुळे डोळ्यांची, तळपायांची आग होत असेल तर कापलेल्या टरबुजाची साल त्या भागावर ठेवावी. थोड्याच वेळात शरीराची आग कमी होते.
-
सौंदर्यवर्धनासाठीही कलिंगड उपयुक्त ठरते. कलिंगडाची साल चेहऱ्यावर चोळल्याने चेहऱ्यावरचा तजेला वाढतो.
-
कलिंगडाचे बी हे अतिशय पौष्टिक व चवदार असते. मुखशुध्दीसाठी बडिशेपमध्ये कलिंगडाचे बी वापरावे तसेच घरी बनवलेले लाडू, बर्फी यामध्येही या बीचा सजावटीसाठी वापर करावा.
-
यापासून केलेले तेल हे पौष्टिक असते. त्याच्याही खाद्यपदार्थ म्हणून वापर करता येतो.
-
कलिंगडाचे बी टणक असल्यामुळे सोलायला कठीण असते. म्हणून थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करावे व त्याचा रस गाळणीतून गाळून घ्यावा व हे गाळलेले पांढरे दूध रश्श्याच्या भाजीत किंवा आमटीत घालावे.
-
या बियांमध्ये प्रथिने, क्षार व शरीरास उपयुक्त असा मेद भरपूर प्रमाणात असतात व त्याचा आरोग्य चांगले राहण्यासाठी उपयोग होतो.
-
कलिंगडाचा लाल गर काढल्यानंतर, सालीचा पांढरा गर हा फेकून न देता त्याचा वापर कोशिंबीर, थालीपीठ, कटलेट, भजी, धिरडे, भाजी यांमध्ये करावा.
-
कलिंगडाची हिरवी साल स्वच्छ धुऊन बारीक किसून सांडगे बनविण्यासाठी वापरावी यामध्ये लोह, चोथा व ‘ब’ जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असते.
-
कलिंगडामध्ये पाणी व पोटॅशिअमचे प्रमाण हे सर्वात जास्त असते. त्यामुळे मूत्राशयाच्या व किडनीच्या तक्रारींवर व लघवीला जळजळ होत असेल तर कलिंगड खाल्ल्यास फायदा होतो.
-
कलिंगडमध्ये लाइकोपिन असते. लाइकोपिनने आपली त्वचा तरुण राहते.
-
अपचन, भूक वाढवणे तथा रक्ताची कमतरता असेल तर कलिंगड खूप लाभदायी ठरते.
-
कलिंगडच्या फोडींवर काळी मिरी पावडर, सैंधव भुरभुरून खाल्याने आंबट ढेकर येणे थांबते.
-
कलिंगडचा पल्प ‘ब्लकहेड्स’ने प्रभावित झालेल्या जागेवर चोळा आणि एक मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या.
-
(सर्व फोटो : Pexels)

Pune Swargate Rape Case : “तो माझ्या संपर्कातील मैत्रिणींचे…”, पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीबाबत मैत्रिणीकडून मोठी माहिती; म्हणाली…