-
आवळा त्याच्या अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-कॅन्सर आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांसाठी देखील ओळखला जातो आणि म्हणूनच तो शरीरासाठी खूप फायदेशीर मानला जातो. (फोटो: indian express)
-
या उन्हाळ्यात तुम्ही अनेक प्रकारे याला आहाराचा भाग बनवू शकता. तर त्याचे या पद्धतींबद्दल जाणून घ्या. (फोटो: indian express)
-
व्हिटॅमिन सीचा सर्वोत्तम स्रोत असल्याने, आवळा रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी प्रभावी मानला जातो. (फोटो: indian express)
-
उन्हाळ्यात आवळा मुरंबा हा पदार्थ सगळ्यांना खूप आवडतो. यामध्ये असलेले घटक शरीराला थंड ठेवण्याचे काम करतात. (फोटो: jansatta)
-
याकरिता तुम्ही प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरगुती पद्धतीने बनवलेली आवळा कँडी बाजारात सहज उपलब्ध असते. त्याचे देखील सेवन तुम्ही दिवसभरात करू शकता.(फोटो: jansatta)
-
आवळा लोणचे अजूनही अनेक घरांमध्ये साठवले जाते आणि ते मोठ्या आवडीने खाल्ले जाते. यामध्ये असलेले फायबर बद्धकोष्ठता, जुलाब इत्यादी पाचक आजारांपासून आराम देण्यास मदत करते. (फोटो: indian express)
-
त्याची खासियत अशी आहे की यामध्ये असलेले फायटोन्यूट्रिएंट्स मेंदूच्या पेशींना नुकसान करणाऱ्या फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. (फोटो: indian express)
-
उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी तुम्ही आवळ्याच्या चटणीचेही सेवन करू शकता. (फोटो: indian express)
-
यापासून बनवलेली चटणी व्यवस्थित ठेवली तर ती लवकर खराब होत नाही. पोटाशी संबंधित समस्यांवरही या चटणीने मात करता येते.(फोटो: indian express)
Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा