-
आपण जे अन्न खातो त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. चांगले अन्नच आपल्याला निरोगी आणि तंदुरुस्त बनवते.
-
महिलांमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता खूप जास्त आहे, म्हणूनच महिलांनी त्यांच्या आहारात कमी फॅटयुक्त दुधाचा समावेश केला पाहिजे.
-
व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम दोन्ही दुधामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात आणि व्हिटॅमिन डी कॅल्शियम हाडे मजबूत करण्यास मदत करते, म्हणूनच महिलांनी दूध सेवन करणे आवश्यक आहे.
-
टोमॅटोचा वापर आपण अनेक भाज्यांमध्ये करत असलो तरी महिलांसाठी तो सुपरफूड मानला जातो. खरंतर टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचे पोषक तत्व आढळून आले आहे, जे महिलांना स्तनाच्या कर्करोगापासून वाचवण्यास उपयुक्त ठरते. याशिवाय यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांपासून बचाव होतो.
-
बीन्स खाणे बहुतेकदा लोकं टाळतात, परंतु हे बीन्स महिलांसाठी चांगले आहेत, कारण ते खाल्ल्याने हृदयरोग आणि स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. वास्तविक, यामध्ये प्रथिने आणि फायबरचे गुणधर्म आहेत, जे वजन नियंत्रित करण्यास मदत करतात.
-
जर तुम्हाला मांसाहार खायचे असेल तर फिश हा तुमच्यासाठी खूप आरोग्यदायी पर्याय आहे. महिलांनी त्यांच्या आहारात सॅल्मन, सार्डिन आणि मॅकरेल माशांचा समावेश केला पाहिजे. महिलांनी माशांचे सेवन केल्यास त्वचा, हृदयविकार, पक्षाघात, उच्च रक्तदाब या आजारांपासून दूर राहता येते.
-
महिलांनी आपल्या आहारात प्रथिने, लोह आणि व्हिटॅमिन बी समृध्द सोयाबीनचाही समावेश करावा. सोयापासून बनवलेल्या पदार्थांचाही आहारात समावेश करावा.
-
महिलांनी त्यांच्या आहारात दही किंवा कमी फॅटयुक्त दही घेणे आवश्यक आहे. अनेक रिपोर्ट्सनुसार, दही खाल्ल्याने महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो. हाडे मजबूत होण्यासोबतच पोटाशी संबंधित समस्यांमध्येही दही आराम देते.
-
बेरी हे महिलांच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहेत, म्हणूनच महिलांनी स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, ब्लूबेरी आणि क्रॅनबेरी खाणे आवश्यक आहे. बेरी महिलांना स्तन आणि कोलन कर्करोगापासून वाचवण्यास देखील मदत करतात. (all photos: indian express)
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”