-
केसांच्या चांगल्या वाढीसाठी केसांची काळजी घेणे आवश्यक आहे. केसांची वाढ वाढवण्यासाठी केसांना तेल लावणे आवश्यक आहे.
-
केसांना तेल लावल्याने केसांचे पोषण होते आणि केस निरोगी राहतात. केसांना तेल लावल्याने रक्ताभिसरण सुरळीत राहते तसेच केसांची वाढही होते.
-
आठवड्यातून दोनदा केसांना मसाज केल्याने कोंडा दूर होतो आणि केसांना चमक येते.
-
केसांना तेल लावणे जेवढे आवश्यक आहे तेवढेच केसांना योग्य पद्धतीने तेल लावणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
-
तेल हे खराब झालेल्या केसांवर उपचार करते आणि टाळू निरोगी बनवते.
-
नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या वेबसाईटवर असलेल्या एका संशोधनानुसार केसांना तेल लावल्याने केस निरोगी आणि चमकदार होतात.
-
केसांना तेल लावण्यापूर्वी तुम्हाला त्वचेनुसार आणि केसांनुसार तेल निवडा. आता हे तेल हलके गरम करा आणि बोटांच्या मदतीने केसांच्या मुळांना लावा.
-
तेल लावताना लक्षात घ्या की बोटांच्या साहाय्याने केसांना तेल लावा आणि केसांच्या मुळापर्यंत मसाज करा. तेल लावण्यासाठी हाताचे तळवे वापरणे टाळा. तळहातांना तेल लावल्याने केस तुटण्याची शक्यता असते.
-
केसांना तेल लावल्यानंतर गरम टॉवेलने केसांना वाफ द्या. एक टॉवेल गरम पाण्यात भिजवा आणि तो पिळून घ्या आणि नंतर त्या टॉवेलमध्ये केस गुंडाळा. गरम टॉवेलमध्ये केस गुंडाळल्याने त्वचेची छिद्रे उघडतील आणि तेल केसांमध्ये चांगले शोषले जाईल. केसांना तेल लावल्यानंतर एक तासानंतर शॅम्पूने केस धुवा. आठवड्यातून दोनदा असे तेल केसांना लावा, केसांची वाढ चांगली होईल आणि केस निरोगी राहतील. (all photos: indian express)

Dr. Ambedkar Jayanti: डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर HD Images