-
दूध अधिक रुचकर बनवण्यासाठी तुम्ही साखरेव्यतिरिक्त अनेक गोष्टी करून पाहिल्या असतील. पण तुम्ही दूध आणि गुलकंदचं मिश्रण करून पाहिलंय का? जर तुम्हाला सामान्य दूध पिण्याचा कंटाळा आला असेल तर गुलकंद दूध वापरून पहा आणि त्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या. (फोटो: indian express)
-
कामाचा ताण आणि जबाबदारी यांमुळे निर्माण होणारा ताण कमी करणे खूप गरजेचे आहे. (फोटो: indian express)
-
गुलकंद दूध प्यायल्याने तुम्ही तणाव बऱ्याच प्रमाणात कमी करू शकता. तज्ज्ञांच्या मते, यामुळे मज्जातंतूंना आराम मिळतो आणि तुम्हाला बरे वाटते. (फोटो: indian express)
-
कोमट दुधाचे सेवन पोटासाठी फायदेशीर मानले जाते, मात्र त्यात गुलकंद टाकून प्यायल्यास बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करता येते. (फोटो: jansatta)
-
गुलकंदमध्ये आढळणारे मॅग्नेशियम बद्धकोष्ठतेची समस्या कमी करते. (फोटो: jansatta)
-
दूध हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते, पण त्यात गुलकंद मिसळून प्यायल्याने डोळ्यांच्या आरोग्याला फायदा होतो. (फोटो: indian express)
-
या दोघांच्या मिश्रणाने डोळ्यांची दृष्टी वाढू शकते, असे म्हटले जाते. (फोटो: indian express)
-
अल्सरची समस्या पोटात गडबड झाल्यामुळे होते. पोट नीट साफ न झाल्यास तोंडात व्रण देखील होऊ शकतात. (फोटो: jansatta)
-
पोट साफ करण्यासाठी रोज एक ग्लास कोमट दूध गुलकंदसोबत प्या. ते मर्यादित प्रमाणातच सेवन करा. (फोटो: jansatta)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ