-
आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते.
-
आपल्या भारतीयांच्या सगळ्या समस्यांवर एकच उपाय म्हणजे चहा.
-
टेन्शन आल्यावर चहा, डोकं दुखत असेल तर चहा, झोप येत असेल तर चहा.
-
चहाशिवाय चहाप्रेमींच्या दिवसाची सुरुवातही होत नाही आणि दिवस संपतही नाही.
-
एवढंच काय अनेक कार्यक्रमांत, समारंभातही आवर्जून चहाचा आस्वाद घेतला जातो.
-
आलं घातलेला, गवती किंवा तुळस चहा आरोग्यदायी मानला जातो.
-
दररोज चहा पिण्याचे काही आश्चर्यकारक फायदेदेखील आहेत.
-
वजन कमी करण्यास मदत : जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या आहारात चहाचा समावेश करा.
-
चहाचे सेवन केल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
-
चहामुळे शरीरातील मेटाबॉलिझम देखील वाढते.
-
कॅलरीज कमी प्रमाणात असलेल्या ग्रीन टीचे देखील तुम्ही सेवन करू शकता.
-
मानसिक आरोग्य : टेन्शन आल्यावर किंवा ताण-तणावाखाली असताना आपल्यापैकी अनेक जण चहा पितात.
-
चहामध्ये असे अनेक गुणधर्म आहेत ज्यामुळे डोकेदुखी, ताण-तणाव कमी होण्यास मदत होते.
-
त्यामुळे मानसिक आरोग्य देखील सुधारते.
-
पचनक्रिया सुधारते : पचनाचा त्रास, पोटदुखी होत असेल तर आहारात आयुर्वेदिक चहाचा समावेश जरूर करा.
-
चहामुळे पचनक्रिया सुधारून पोटदुखीचा त्रास कमी होतो.
-
आयुर्वेदिक किंवा आल्याचा चहाचे तुम्ही सेवन करू शकता.
-
ह्रद्याचे आरोग्य : चहा ह्रद्याच्या आरोग्यासाठी गुणकारी आहे, हे सांगितल्यावर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
-
चहात ह्रद्यविकाराचा धोका कमी करण्याचे गुणधर्म आहेत.
-
चहामुळे ह्रद्याचे स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होते.
-
कॅन्सर प्रतिरोधक : ग्रीन आणि ब्लॅक टीचे सेवन केल्यास कॅन्सरचा धोका कमी होतो.
-
चहाचे सेवन केल्याने शरीरात कॅन्सरला प्रतिरोध करणाऱ्या पेशींची वाढ होते.
-
त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.
-
(सर्व फोटो : Pexels, Unsplash)

Pune Swargate Rape Case Live Updates : पुणे बलात्कार प्रकरणानंतर परिवहन मंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय; म्हणाले, “१५ एप्रिलपर्यंत…”