-
विमान (airplane) प्रवासामुळे लोकांचे जीवन खूप सोपे झाले आहे. कमी वेळात लांबचे अंतर कापणारी ही विमाने काळानुसार बदलत गेली.
-
आपल्यापैकी अनेकांना विमानात विंडो सीट अर्थात खिडकी असलेली सीट हवी असते.
-
पण तुम्ही कधी विचार केला आहे का की विमानाच्या खिडक्या (Airplane Windows) गोल किंवा अंडाकृती का असतात?
-
जर तुम्हाला माहित नसेल तर जाणून घ्या की, आधी चौकोनी आकारात असलेल्या या खिडक्या गोलाकार का केल्या गेल्या.
-
१९५० च्या दशकात जेव्हा विमान सामान्य लोकांसाठी सुरु केले गेले तेव्हा विमानांना चौकोनी खिडक्या होत्या.
-
या चौकोनी खिडक्यांमुळे १९५३ मध्ये दोन विमाने हवेतच खराब झाली आणि ५६ जणांना प्राण गमवावे लागले. या अपघाताचे कारण विमानाच्या खिडक्या होत्या.
-
विमानातील खिडक्या त्यांच्या चौकोनी कोपऱ्यांमुळे असुरक्षित असतात, खिडकीच्या या डिझाईनमध्ये चार कमकुवत स्पॉट्स असतील आणि दबावाखाली ते हवेत क्रॅक होऊ शकतात.
-
यामुळे खिडक्या गोलाकार बनविल्या जातात किंवा कोपरे वक्र केले जातात, ज्यामुळे दबाव वितरीत होतो आणि खिडक्यांना नुकसान होण्याची शक्यता कमी होते.
-
विमानाच्या गोल खिडक्या चौकोनी खिडक्यांपेक्षा अधिक मजबूत असतात आणि पुढील वाऱ्याच्या दाबाला तोंड देऊ शकतात. (सर्व फोटो: Pixabay)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा