-
वैशाख महिन्यात शुक्ल पक्षात येणारा अक्षय्य तृतीया हा सण हिंदू आणि जैन धर्मियांसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो. यावर्षी ३ मे रोजी अक्षय्य तृतीया आहे.
-
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा हा दिवस ग्रहांच्या स्थितीनुसार शुभ आणि पवित्र मानला जातो. या दिवसाचे हिंदू परंपरेत खूप महत्वाचे स्थान आहे.
-
या दिवशी कोणतेही शुभ काम केल्यास त्यात यश मिळतेच असा मानस आहे.
-
अक्षय तृतीयेची आणखी एक महत्वाची ओळख म्हणजे या दिवशी अनेक जण सोन्याच्या खरेदीला पसंती दर्शवतात.
-
या दिवशी सोने खरेदी केलं तर घरात कायम संपत्ती येते, अशी एक श्रद्धा आहे.
-
संपत्तीचा देव म्हणजे कुबेर यांनी शंकराची उपासना करून याच दिवशी संपत्ती मिळवली अशी धारणा आहे.
-
संपत्तीचा मापदंड म्हणजे कुबेर असल्यामुळे या दिवसाला हिंदू धर्मात संपत्तीच्या दृष्टीनं अनन्यसाधारण महत्त्व आहे.
-
संस्कृतमध्ये अक्षय्य या शब्दाचा अर्थ ज्याचा कधीच क्षय होत नाही, जे कधीच संपत नाही असा होतो.
-
या दिवशी सोने खरेदी करणं म्हणजे कुबेराची मर्जी राखणं, त्याला खूश करणं. जेणेकरून घरात कायम संपत्तीचा वरदहस्त राहील, अशी श्रद्धा आहे.
-
हिंदूंचं थोर संचित व महाकाव्य असलेलं ‘महाभारत’ लिहिण्यास वेद व्यासांनी आजच्याच मुहूर्तावर सुरूवात केली होती अशी मान्यता आहे.
-
त्यामुळे सोने खरेदी करण्याशिवाय नवीन उपक्रम, उद्योग सुरू करण्यासाठीही हिंदू धर्मामध्ये हा दिवस अत्यंत योग्य असा मानण्यात येतो.
-
(सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं