-
अन्नाची चव वाढवण्यासाठी स्वयंपाक करताना आपण वेवेगळ्या मसाल्यांचा वापर करतो. अन्नाची चव वाढवण्यासोबतच मसाल्यांचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत.
-
परंतु सर्वच मसाले प्रत्येक ऋतूमध्ये तुमच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतीलच असे गरजेचे नाही. असेही काही मसाले आहेत जे उन्हाळ्यात खाणे टाळावेत.
-
तथापि, कमी प्रमाणात या मसाल्याचे सेवन केल्यास तर शरीरास अपाय होण्याची शक्यता कमी असते. मात्र जर या मसाल्यांनी बनवलेले अन्न जास्त प्रमाणात खाल्ले तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
-
आज आपण जाणून घेऊया, असे कोणते मसाले आहेत, ज्यांच्या जास्त सेवनामुळे समस्या निर्माण होऊ शकतात.
-
हळद : हळद ही आपल्या शरीरासाठी चांगली आहे हे सर्वांनाच माहीत आहे, पण जर तिचा जास्त प्रमाणात वापर केला तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
-
विशेषत: महिलांनी मासिक पाळीत हळदीचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. असे न केल्यास जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो असे सांगितले जाते.
-
तुळस : फार कमी लोकांना हे माहित असेल की याचे जास्त सेवन केल्याने रक्तदाब कमी होतो. याचा महिलांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुळशीचा वापरही कमी करावा.
-
दालचिनी : दालचिनीचे अनेक फायदे आहेत, परंतु याचे जास्त सेवन केल्याने तोंडात फोड येऊ शकतात. तसेच, रक्तदाब कमी होऊ शकतो.
-
काळीमिरी : काळी मिरी बहुतेक भाज्यांमध्ये वापरली जाते. यामुळे वजनही कमी होते हे सर्वांनाच माहित आहे, पण जर एखाद्या व्यक्तीला रक्त गोठण्याची समस्या असेल तर काळी मिरी तुमच्यासाठी फायदेशीर नाही.
-
येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या. (सर्व फोटो : Pixabay)
Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा