-
उन्हाळ्यात अतिनील किरणांमुळे त्वचेचे खूप नुकसान होते. हानिकारक अतिनील किरणांमुळे त्वचेवर टॅन जमा होतो. आपला चेहरा आणि हात टॅनपासून वाचवण्यासाठी आपण अनेक प्रकारची सौंदर्य उत्पादने वापरतो. मात्र अशा परिस्थिती अनेकजण पायांकडे दुर्लक्ष करतात. (photos: pexels)
-
चेहरा आणि हातांसोबतच तुम्ही तुमच्या पायांचीही काळजी घेणे महत्त्वाचे आहे. (photo: pexels)
-
कडक उन्हात पायांची काळजी घेण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करा. मऊ आणि सुंदर पायांसाठी तुम्ही ‘या’ टिप्स फॉलो करू शकता. (photo: pexels)
-
दर आठवड्याला तुमचे पाय एक्सफोलिएट करा. असे केल्याने पायावर साचलेली घाण निघून जाईल. हे मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करेल. यामुळे तुमचे पाय मऊ होतील. (photo: pexels)
-
तुम्ही होममेड स्क्रब वापरू शकता. एक चमचा ओट्समध्ये १ ते ३ चमचे मध मिसळून तुम्ही पाय स्क्रब करू शकता. यामुळे पाय मऊ होण्यास मदत होईल. (photo: indian express)
-
आपल्या टाचा खूप कोरड्या असतात. चालताना आपल्या टाचांवर खूप ताण येतो. अशा स्थितीत टाचांना मॉइश्चरायझ करणे खूप आवश्यक आहे. टाचांना मॉइश्चरायझ करण्यासाठी तुम्ही लोशन किंवा तेल वापरू शकता. त्यामुळे पायाची आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते. (photo: indian express)
-
तुमचे पाय स्वच्छ करण्यासाठी तुम्ही प्युमिस स्टोन वापरू शकता. हे पायातील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करते. पाय स्वच्छ करण्यासाठी तुम्ही त्याचा नियमित वापर करू शकता. (photo: amazon.in)
-
कडक सूर्यप्रकाशामुळे पायांवर टॅन जमा होते. सनस्क्रीन केवळ आपल्या चेहऱ्यावर आणि हातांवरच नाही तर पायांनाही आवश्यक आहे. त्यामुळे पायांना नियमितपणे सनस्क्रीन वापरा. यामुळे तुमचे पाय टॅनपासून वाचण्यास मदत होईल. (photo: pexels)
-
उन्हाळ्यात शूज सतत परिधान केल्याने पायाला दुर्गंधी येते. खूप घट्ट शूज किंवा चप्पल घालणे टाळा. जर तुम्ही शूज घातले तर दिवसातून एकदा ते उघडण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या पायांना थोडा आराम मिळेल.(photo: indian express)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल