-
घरातील रोजच्या वापरतील अशा अनेक गोष्टी असतात ज्याला एक्सपायरी डेट असते हे अनेकांना माहितच नसतं.
-
अगदी टूथब्रश, टॉवेल इत्यादी दैनंदिन वापराच्या वस्तूंनाही एक्सपायरी डेट असते.
-
लोक अशा गोष्टी वापरताना एक्सपायरी डेटकडे लक्ष देत नाहीत आणि ते पूर्णपणे खराब किंवा तुटल्याशिवाय त्याचा वापर थांबत नाहीत.
-
तुम्हीही असच करत असाल तर सावध व्हा करण अशामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याशी खेळत आहात.
-
खाली काही दैनंदिन घरगुती वस्तूंची यादी देत आहोत ज्यांना देखील एक्सपायरी डेट असते.
-
उशी- कालांतराने उशीमध्ये धुळीचे कण, त्वचेच्या मृत पेशी आणि ऍलर्जी निर्माण करु शकतील अशा गोष्टींचं आश्रयस्थान बनू शकतात.
-
अनेकदा फार जुन्या उशीमुळे मानदुखीचा त्रास होऊ शकतो. उशीची एक्सपायरी डेट दोन ते तीन वर्षे असतात. फोटो : Unsplash )
-
स्लीपर – आपल्यापैकी बरेच जण स्लीपर तुटत नाहीत तोपर्यंत वापरतात किंवा नवीन जोडी विकत घेतली तरी आपण बाथरूममध्ये जुनी चप्पल वापरण्यास सुरुवात करतो आणि त्यामुळेच पायाला बुरशीजन्य संसर्ग होतो.
-
आपण दर सहा महिन्यांनी त्या बदलल्या पाहिजेत. या स्लीपर सर्व प्रकारचे जंतू पकडतात आणि पसरवतात, आणि अगदी कमी कालावधीत त्यांना नियमित साफसफाईची आवश्यकता असते.
-
शॉवर पफ – याची एक्सपायरी डेट दोन आठवडे आणि सहा महिन्यांची असते कारण काही कालावधीनंतर ते सहजपणे बुरशीचे भांडार बनतात. बरं, ते तुमच्या शरीरावरची सर्व घाण काढून घेतात, त्यामुळे सर्व घाण त्यांच्यावर जमा होते आणि त्यावरूनच संसर्ग होणायची भीती असते.
-
कोणत्याही प्रकारचा आजार टाळण्यासाठी तुम्ही त्यांना गरम पाण्याने स्वच्छ करा. फोटो : Unsplash )
-
टॉवेल – तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या आवडत्या टॉवेलला १-३ वर्षांत नवीन टॉवेलने बदलण्याची गरज आहे? बाथरूममध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टॉवेल जे अनेकदा जंतूंनी वेढलेले असतात.
-
टॉवेल नियमितपणे धुतले नाहीत तर ते अनेक आजारांचे कारण बनतात. त्यामुळे टॉवेल कितीही सुंदर असला तरी तो तीन वर्षांपेक्षा जास्त काळ वापरू नका. (फोटो : Unsplash )
-
ब्रश- दिवसातून दोन वेळा दात घासणे हे गरजेचं आहे हे सगळ्यांना माहित आहे. ब्रिस्टल्स पूर्णपणे तुटले जाईपर्यंत आपल्यापैकी बरेच जण कधीही आपले टूथब्रश फेकून देण्याची तसदी घेत नाहीत.
-
परंतु, आपण दर तीन महिन्यांनी नवीन टूथब्रश वापरायला सुरु करायल हवेत. तुम्ही सर्दीतून बरे झाल्यानंतरही तुम्ही ब्रश बदलला पाहिजे जरी, तीन महिने झाले नसले तरी. याचं कारण तुम्ही तोच ब्रश वापरला तर पुन्हा आजारी पडण्याचा धोका असू शकतो.
-
कंगवा- एक हेअरब्रश अर्थात कंगवा जो तुमच्या निरोगी केसांची काळजी घेतो आणि तुम्हाला तुमची आवडती हेअरस्टाईल बनवण्यास मदत करतो त्यालाही एक्सपायरी डेट असते. परंतु आपल्यापैकी अनेकांना हे माहित नाही की तुम्ही आठवड्यातून एकदा तरी हेअरब्रश साफ न केल्यास तुमचे केस खराब होऊ शकतात.
-
१ वर्षापेक्षा जास्त काळ हेअरब्रश वापरू नका.
-
परफ्यूम्स – सेंट, परफ्यूम्स हे शरीराच्या दुर्गंधींना कमी करतात आणि आपल्याला दिवसभर ताजेतवाने राहण्यासही मदत करतात. परंतु, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की परफ्यूम एक्सपायरी डेट असते. जर तुम्हाला तुमचा परफ्यूम जास्त काळ टिकवायचा असेल तर त्याला थंड, गडद ठिकाणी ठेवा.
-
तुमच्या परफ्यूमचा रंग किंवा वास बदलत असल्यास, ते कचर्यात फेकण्याची वेळ आली आहे असे समजा. तथापि, तुम्ही सीलबंद परफ्यूमची बाटली तीन वर्षांपर्यंत ठेवू शकता, तर दोन वर्षांपर्यंत सील नसलेली.
-
पॅसिफायर – ज्यांच्या घरी लहान मुल आहेत त्यांना पॅसिफायर बद्दल नक्कीच माहिती असेल. बहुतेक पॅसिफायर हे लेटेक्स असतात आणि तुम्ही ते निश्चितपणे दोन ते पाच आठवड्यांच्या आत बदलले पाहिजेत.
-
जेव्हा तुम्हाला पॅसिफायरमध्ये क्रॅक किंवा ब्रेक दिसला तेव्हा ते बदलले पाहिजेत कारण ते जंतू तुमच्या बाळाच्या तोंडावाटे शरीरात जाऊन बाळाला आजारी पाडू शकते.
-
बेबी कार सीट: बाळाच्या कार बेबी सीटलाही वैधता आहे. सरासरी, कार सीट वापरण्यासाठी कमाल वय सहा वर्षे आहे, परंतु हा कालावधी डिव्हाइस कसा वापरला जाईल यावर अवलंबून बदलू शकतो.
-
जरी कार सीट उत्तम प्रकारे काम करत असली तरीही, अपघात टाळण्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी जास्तीत जास्त सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आपण सूचित कालावधीनंतर तो फेकून द्यावा.
-
रनिंग शूज- तुमचे रनिंग शूज, ते कायमचे टिकणार नाहीत. होय, तुमचे शूज चांगले दिसत असतील तर तुम्हाला आणखी काही वर्षे टिकतील असं वाटतं. परंतु त्यांचा नियमित वापर हा तुमच्या सांध्यासाठी मृत्यूची घंटा ठरू शकतो.
-
जर तुम्ही तोज हे शूज वापरत असाल तर एक वर्षापर्यंतच ते वापरा. (सर्व फोटो: Freepik, Pixabay)

Shani Gochar 2025: शनीच्या साडेसाती आणि ढैय्येपासून ५ राशींना मिळणार सुटका, करिअरमध्ये घेणार मोठी झेप, वर्षभर होईल पैशांचा पाऊस