-
प्रवासाला सुरुवात करण्याआधी आपली व्यवस्थित झोप झाली असेल तरी आपल्याला कारमध्ये बसलं की झोप येते. असं काय होत? या मागचं नेमकं कारण काय? असे अनेक प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतील.
-
यासंदर्भातील संशोधनात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.
-
यामागे स्लीप डेब्ट , कंटाळा आणि महामार्गावरील हिप्नोसिस (Highway Hypnosis) हे कारण समोर आले आहे.
-
जर तुम्ही कुठे फिरायला जाणार असाल तर त्याआधी तुम्ही खूप तयारी केलेली असते पण तरीही काहीही राहू नये, चुकू नये असहा या गोष्टींचा विचार तुमच्या मनात चालू असतात.
-
यामुळे तुम्ही पुरेशी झोप घेऊ शकत नाही. याला स्लीप डेब्ट (Sleep Debt)म्हणतात. प्रवासादरम्यान झोप येण्याचे हे सर्वात मोठे कारण बनते.
-
संशोधनानुसार, चालत्या वाहनात असतानाच लोकांना झोप येते. जेव्हा ते काहीही करत नसतात नाही.
-
या दरम्यान मन आणि शरीर विश्रांतीच्या स्थितीत पोहोचतात. त्यामुळे प्रवासादरम्यान लोकांना झोप येऊ लागते. या स्थितीला हाइवे हिप्नोसिस म्हणतात.
-
संशोधनात असे म्हटले आहे की, चालत्या वाहनातील हालचाल देखील प्रवासादरम्यान झोप आणण्याचे काम करते.
-
या दरम्यान तुमचे शरीर लहानपणी जसं आई मुलाला झुलवत छान झोपी घालवते अशा स्थितीत जाते. विज्ञानाच्या भाषेत त्याला रॉकिंग सेंसेशन (Rocking Sensation) म्हणतात.
-
जेव्हा तुम्ही एकाच फ्लोमध्ये फिरता तेव्हा त्याला रॉकिंग सेन्सेशन म्हणतात.
-
याचा मेंदूवर सिंक्रोनाइझिंग प्रभाव पडतो. ज्याद्वारे तुम्ही स्लीपिंग मोडमध्ये जाता. त्याला स्लो रॉकिंग असेही म्हणतात.
-
या वरील सर्व कारणांमुळे आपल्याला प्रवासात गाडीमध्ये झोप लगते. (सर्व फोटो: freepik)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…