-
भारतातील काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटले जाते. तिथली सुंदर मैदाने बघायची प्रत्येकाला इच्छा असते.
-
दोन वर्षे कोरोनाच्या सावलीत राहिल्यानंतर आता लोकांनी देशात फिरण्याचे नियोजन सुरू केले आहे.
-
पण सध्याचा कडक उन्हाळा पाहून, प्रत्येकजण थंड ठिकाणी जाण्याचा विचार करत असेल.
-
त्यामुळे जर तुम्हाला काश्मीरमधील बर्फाचा आणि थंडपणाचा आनंद घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्ही IRCTC चे भन्नाट काश्मीर पॅकेज टूरचा आनंद घेऊ शकता.
-
हे IRCTC पॅकेज 6 दिवस आणि 7 रात्रीसाठी असेल. या पॅकेजमध्ये तुम्हाला नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाचीही सुविधा मिळेल.
-
पॅकेज अंतर्गत तुमचा प्रवास २६ मेपासून सुरू होईल आणि १ जून २०२२ रोजी रांचीमध्ये संपेल.
-
तुम्हाला इकॉनॉमी क्लासमध्ये रांची ते दिल्ली आणि दिल्ली ते श्रीनगर असा तुमचा प्रवास असेल.
-
संपूर्ण पॅकेजमध्ये, तुम्ही श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम इत्यादी ठिकाणांना भेट देऊ शकाल.
-
यानंतर, श्रीनगरमध्ये तुम्हाला सोनमर्ग येथे राहण्याची आणि तेथे हाऊसबोटमध्ये एक रात्र राहण्याची सुविधा मिळेल.
-
६ रात्री आणि ७ दिवसांच्या या पॅकेजवर तुम्ही एकटे जात असाल तर तुम्हाला ४९,८०० रुपये मोजावे लागतील.
-
दोन लोक जात असाल तर तुम्हाला ३३.९५० रुपये द्यावे लागतील. जर तुम्ही तीन लोक एकत्र जात असाल तर तुम्हाला ३२,६०० रुपये द्यावे लागतील.

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही