-
भारतीय रेल्वे हे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे.
-
भारतात एकूण १२,१६७ पॅसेंजर ट्रेन्स आणि ७,३४९ मालगाड्या आहेत. भारतीय रेल्वेतून दररोज २३ मिलियन प्रवासी प्रवास करतात.
-
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ही संख्या ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण लोकसंख्येएवढी आहे.
-
जर तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण केले असेल असेल तर तुमच्या लक्षात आले असेल की ट्रेनचे डबे तीन रंगाचे असतात.
-
ट्रेनचे डबे लाल, निळे आणि हिरव्या रंगाचे का असतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
-
आज आपण यामागील कारण जाणून घेऊया.
-
लाल कोच : आजकाल भारतात लाल रंगाच्या डब्यांची संख्या खूप वाढली आहे.
-
लाल रंगाच्या डब्यांना LHB म्हणजेच Linke Hofmann Busch म्हणतात. ते पंजाबमधील कपूरथला येथे तयार केले जातात.
-
हे डबे तयार करण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर केला जातो. यामुळे हे डबे वजनाने हलके असतात. हे डबे डिस्क ब्रेकसह २०० किमी/ताशी वेगाने चालवता येतात.
-
त्याच्या देखभालीवरही कमी खर्च येतो. अपघात झाल्यास हे डबे एकमेकांच्या वर चढत नाहीत. कारण त्यांच्याकडे सेंटर बफर कुलिंग सिस्टम आहे.
-
निळा कोच : निळ्या रंगाचे डबेही मुबलक प्रमाणात दिसतात. त्यांना इंटिग्रल कोच फॅक्टरी कोच म्हणतात.
-
निळ्या कोचच्या ट्रेनचा वेग ७० ते १४० किमी/ताशी असतो. मेल एक्सप्रेस किंवा सुपरफास्ट गाड्यांमध्ये हे डबे वापरले जातात. इंटिग्रल कोच फॅक्टरी तामिळनाडू येथे आहे.
-
हे डबे तयार करण्यासाठी लोखंडाचा वापर केला जात असल्याने हे डबे जड असतात, त्यामुळे त्यांच्या देखभालीचा खर्च जास्त असतो.
-
या डब्यांना दर १८ महिन्यांनी ओव्हरहॉल करणे आवश्यक आहे.
-
हिरवा कोच : गरीब रथ गाड्यांमध्ये हिरवे कोच वापरले जातात. तर मीटरगेज गाड्यांमध्ये तपकिरी रंगाचे डबे वापरले जातात. नॅरोगेज गाड्यांमध्ये हलक्या रंगाचे डबे वापरले जातात.
-
भारताबद्दल बोलायचे झाले तर आता देशातील नॅरोगेज गाड्यांचे संचालन जवळपास बंद झाले आहे. (सर्व फोटो : Indian Express)
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच