-
पावसाळा सुरु होतोय. जर तुम्ही तुमच्या गजबजलेल्या शहरापासून दूर थोडा निवांतपणा घेण्याचा विचार करत असाल तर भारतात अशा काही जागा आहेत ज्या तुम्हाला स्वर्गसुखचा अनुभव देतील. पावसाळ्यात तुम्ही या ठिकाणांना एकदा नक्की भेट द्या.
-
केरळमधील स्थित मुन्नार समुद्रसपाटीपासून १७०० मी. उंचीवर वसले आहे. इथून चहाच्या बागांचे सुंदर दर्शन घडते. पर्यटकांना येथे बोटिंगचा आनंदही घेता येतो. मुन्नार हे अत्यंत विशिष्ट डेअरी फार्मसाठी प्रसिद्ध आहे. मुन्नार आणि आसपासचे शोला जंगलात ट्रेकिंग करता येते. या जंगलात विविध प्रकारच्या पक्ष्यांचेही वास्तव्य आहे. येथे एक छोटी नदी आणि पाण्याचा झरा देखील आहे. पावसाळ्यात इथे पर्यटकांची मोठी गर्दी असते.
-
मेघालयातील हिरवळीने नटलेले शिलॉंग शहर पावसाळ्यात पर्यटकांचे खास आकर्षण असते. चारही बाजूला हिरवीगार झाडी, थंड वाहणारा हवा तुमचं मन मोहून टाकेल. एवढचं नाही तर पावसाळ्यात आजूबाजूला पसरणारी धुक्यामुळे ढगात चालत असल्याचा भास तुम्हाला होईल.
-
जर तुम्हाला समुद्र सपाटीचा आनंद घ्यायचा असेल तर आंदमान निकोबार जागा तुमच्यासाठी योग्य आहे. स्वच्छ, सुंदर आणि शांत समुद्र किनारा तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल.
-
कुर्ग हे कर्नाटकातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. कुर्गला भारतातील स्विझरलॅंन्ही म्हणतात. जर तुम्ही वाईन पेयाचे चाहते आहात. तर तुम्हाला कुर्ग मध्ये वेगवेगळ्या वाईनच्या चवी चाखायला मिळतील. इथे हाताने तयार केलेली वाईनही प्रसिद्ध आहे.
-
सगळ्यांना माहिती आहे, की दार्जिलिंगला पर्वतांची राणी म्हणतात. इथले मुख्य आकर्षण हे चहाचे मळे आहेत. लांबलांबपर्यंत पसरलेले चहाचे मळे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. खास करून पावसाळ्यात याठिकाणी पर्यटकांची जास्त गर्दी असते. बाहेर पाऊस आणि हातात गरम गरम चहाचा कप याची गोष्टच निराळी आहे.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख