-
World Cycle Day 2022: योग आणि इतर व्यायाम प्रकरांप्रमाणेच सायकलिंग करणं हे देखील आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आहे. (All Photo Credit : Pexels)
-
सायकलिंगमुळे तुम्ही फिटनेस तर नक्कीच मिळवू शकता मात्र त्याचसोबत तरुण दिसण्यासाठी सायकलिंगची मदत होऊ शकते.
-
सायकलिंगमुळे फुफ्फुसांची क्षमता सुधारण्यासाठी मदत होते.
-
एवढच नाही तर निरोगी हृदयासाठी सायकलिंग हा उत्तम पर्याय आहे.
-
व्यायाम म्हणून काही तास सायकलिंग केल्यास रक्त पेशी आणि त्वतेमध्ये ऑक्सीजनचं पुरेसं प्रमाण उपलब्ध होतं. जेणे करून त्वचा निरोगी आणि तजेलदार राहते
-
त्यामुळे तरुण दिसण्यासाठी सायकलिंगचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
-
सायकलिंगमुळे शरीरातील रोगप्रतिकारक पेशी अधिक सक्रिय होतात.
-
त्यामुळे आजारी होण्याची शक्यता कमी होते.
-
सायकलिंग करणाऱ्यांच्या मेंदूच्या पेशी अधिक सक्रिय असल्याचं आभ्यास समोर आलंय. तसचं नविन पेशी तयार होण्यास मदत होते.
-
सायकलिंगमुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होऊ शकते.
-
जर तुम्ही दिवसा योग्य वेळ सायकलिंग केली तर तुम्हाला रात्री चांगली झोप लागू शकते.
-
सकाळच्या वेळी सायकलिंग करताना जरी थकवा आला तरी नंतर संपूर्ण दिवस चांगली एनर्जी राहते आणि झोपही चांगली लागते.
-
सायकलिंगमुळे शरीराचे अनेक स्नायू मजबूत होतात.
-
शिवाय शरीरात रक्ताभिसरण चांगलं होतं. यामुळे लैगिंक क्षमता वाढण्यास मदत होते.
-
नियमित सायकलिंग केल्याने हृदयाचं कार्य सुरळीत राहतं.
-
सायकलिंग सारख्या व्यायामामुळे शरीरातील कॅलरीज आणि फॅटस् कमी होण्यास मदत होते.
-
सायकलिंगमुळे वजन कमी करण्यास मदत होते.
-
आठवड्यातून काही तास नियमित व्यायम करण्याचे असे अनेक फायदे आहेत. यासाठी सकाळच्या वेळी सायकल चालवणं अधिक उत्तम ठरू शकतं.

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”