-
भेडींची भाजी खायला अनेकांना आवडते. मसाला भेंडी, भेंडी फ्राय अशा प्रकारचे पदार्थ अनेक लोकं आवडीने खातात.(photo: pexels)
-
हिरव्या रंगाचा भेंडी तुम्हाला माहित असेल. पण लाल रंगाच्या भेंडी बद्दल तुम्ही कधी ऐकले आहे का? जाणून घ्या या हटके भेंडीचे फायदे-(photo: pexels)
-
लाल भेडींला कुमकुम भेंडी देखील म्हणतात. ही भेंडी अतिशय पौष्टिक आहे. उत्तर प्रदेशमध्ये जास्त उगवली जाणारी ही भेंडी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू शकते. (photo: amazon)
-
कृषी वैज्ञानिकांनुसार ‘लाल भिंडी’ मध्ये ९४ टक्के पॉलीअनसेचुरेटेड फॅट्स असतात. जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलला कमी करतात. (photo:jansatta)
-
या भेंडीमध्ये ६६ टक्के सोडियम असते. तसेच यामध्ये असणारे ५ टक्के प्रोटीन हे शरीरातील मेटाबॉलिव सिस्टिमला चांगले ठेवते. हिरव्या भेंडी प्रमाणेच तुम्ही या लाला भेंडीची देखील भाजी करू शकता. (photo: indian express)
-
या लाल भेंडीमध्ये एंथोसायनिन आणि फेनोलिक्स असते. यामुळे शरीरातील पोषण मूल्ये वाढतात. या भेंडीमध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन बी कॉम्प्लेक्स देखील आहे. (photo: pexels)
-
लाल भेंडीही गर्भवती महिला, मुलांचा मानसिक विकास आणि त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे. (photo: jansatta)
-
लाल लेडी फिंगर हृदयरोग, कोलेस्टेरॉल आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे. (photo:jansatta)
-
सामान्य हिरव्या भेंडीच्या तुलनेत या लाल भेंडीचे पीक देखील ४५ ते ५० दिवसात तयार होते. (photo: indian express)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख