-
Lucky Plants for Home: हिंदू धर्म असो किंवा मग ज्योतिष, वास्तुशात्र असो या सर्व गोष्टीत काही झाडांना अतिशय शुभ मानले जातात. ही झाडं वातावरण सकारात्मक बनवतात. ही झाडे आनंद आणि समृद्धी आणतात.
-
ज्या घरात ही झाडं आहेत तिथे पैशाची आणि अन्नाची कमतरता कधीच नसते असं मानले जाते. ही रोपे लावल्याने मात लक्ष्मी प्रसन्न होते आणि भरपूर धन देते.
-
गणपतीला दुर्वा खूप प्रिय आहेत हे तर सर्वांना माहित आहे.
-
घरात दुर्वाचे रोप लावल्यास अपत्यप्राप्तीची शक्यता निर्माण होते.
-
दररोज दुर्वाना पाणी अर्पण करा आणि गणपतीला दुर्वा अर्पण करा, तुमचे भाग्य खुलेल.
-
वास्तुशास्त्रात स्नेक प्लांट (snake plant) खूप शुभ मानले जाते. या वनस्पतीमुळे प्रगतीचा मार्ग खुला होतो असं मानले जाते.
-
या वनस्पतीमुळे घरात सुख-समृद्धीही येते.
-
स्टडी किंवा लिव्हिंग रूममध्ये ठेवणे खूप चांगले आहे.
-
केळीचे झाड भगवान विष्णूला खूप प्रिय आहे आणि त्याचा संबंध गुरू ग्रहाशी आहे.
-
ज्योतिषशास्त्रात गुरु हा शुभ ग्रह मानला जातो.
-
गुरु शुभ असेल तर व्यक्तीचे नशीब बलवान राहते. त्याची सर्व कामे सहज होतात.
-
वास्तुशास्त्रात लाजवंतीची वनस्पतीही खूप शुभ मानली जाते.
-
हे रोप घरात लावून रोज पाणी लावल्यास कुंडलीतील राहू दोष दूर होतो
-
राहुमुळे जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. जसे आर्थिक नुकसान, प्रगतीतील अडथळे, रोग, नातेसंबंधातील समस्या इ.
-
लक्ष्मणाच्या रोपाचा संबंध देवी लक्ष्मीशी आहे, हे रोप घरात लावल्याने धनाची देवी लक्ष्मी घरात वास करते.
-
घर संपत्तीने भरलेले राहते.
-
हे रोप घराच्या पूर्व किंवा पूर्व-उत्तर दिशेला लावणे शुभ असते.
-
घराच्या प्रांगणात नारळाचे झाड लावणे खूप शुभ असते.
-
यामुळे घरातील लोकांना रात्रंदिवस चौपट प्रगती होते.
-
तुम्हालाही कामात यश मिळवायचे असेल तर हे झाड लावा.
-
येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. Loksatta.com याची पुष्टी करत नाही. (फोटो: Pixabay)
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO