-
Different Charges on Credit Card: जेव्हा क्रेडिट कार्ड हूशारीने आणि जबाबदारीने वापरले जाते, तेव्हा ते इतर कोणत्याही पेमेंट टूलपेक्साषा उत्तम पर्याय सिद्ध होऊ शकतं. खरं तर, क्रेडिट कार्डचा सुज्ञपणे वापर केल्याने तुम्हाला तुमच्या दैनंदिन खर्चात कॅशबॅक आणि रिवॉर्ड पॉइंटशी संबंधित जास्तीत जास्त फायदे मिळू शकतात.
-
परंतु आधी माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला क्रेडिट कार्डचे फीचर्स तसेच संबंधित चार्जेसबद्दल पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे, विशेषत: जर तुम्ही प्रथमच क्रेडिट कार्ड वापरत असाल. क्रेडिट कार्डशी संबंधित काही महत्त्वाचे शुल्क येथे आहेत ज्यांची तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.
-
हे शुल्क बँकांनुसार बदलते. काही बँका हे शुल्क घेत नाहीत. पण दर वर्षी एवढ्या पैशांची खरेदी करावी लागेल. अशी अटही त्यांनी घातलेली असते. काही बँका कार्डशी कोणतेही बिल जोडण्यासाठी वार्षिक शुल्क माफ करतात. क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यापूर्वी, याबद्दल माहिती घ्या. कारण बँका नेहमी सांगतात की, हे क्रेडिट कार्ड पूर्णपणे मोफत आहे. पण त्यामागे दडलेल्या अटींची माहिती ते देत नाही.
-
प्रत्येक बँकेकडून व्याज आकारले जाते. देय तारखेला पेमेंट न केल्यास हे शुल्क लागू होते. काही लोकांना वाटते की किमान रक्कम भरल्यास व्याज आकारले जाणार नाही. पण ते तसे नाही. किमान रक्कम भरल्यास, तुमची दंडापासून बचत होते परंतु तुम्हाला 40 ते 42 टक्के इतके मोठे व्याज द्यावे लागू शकतं. त्यामुळे देय तारखेच्या दोन-तीन दिवस आधी बिल भरण्याचा प्रयत्न करा.
-
कार्डने खरेदी करताना, तुम्हाला देय तारखेपर्यंत कोणतेही शुल्क न देता पैसे द्यावे लागतील. परंतु रोख रक्कम काढताना असे होत नाही. अशा परिस्थितीत, शक्य असल्यास, क्रेडिट कार्डमधून पैसे काढणे टाळा.
-
जवळपास सर्व बँका क्रेडिट कार्डद्वारे पेट्रोल आणि डिझेलच्या पेमेंटवर अधिभार लावतात. काही बँका हे शुल्क परत करतात तर काही देत नाहीत. परंतु परताव्याचीही एक निश्चित मर्यादा असते. जर तुम्ही त्या मर्यादेपेक्षा जास्त इंधन भरले तर हे शुल्क परत केले जाणार नाही. उदाहरणार्थ, अॅक्सिस बँकेच्या माय लोन कार्डवर पेट्रोल आणि डिझेल भरण्याची मासिक मर्यादा 4,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
-
क्रेडिट कार्ड ऑफर करताना बँका एवढेच सांगतात की या क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही परदेशात व्यवहार करू शकता. पण परदेशात क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी किती शुल्क आकारले जाते हे कोणीच सांगत नाही.
-
तुम्हीही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर आधी खात्री करा की तुमच्याकडे ज्या बँकेचे क्रेडिट कार्ड आहे, ते वापरण्यासाठी किती शुल्क आकारले जाईल? (All Photos : Freepik)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…