-
शरीरसंबंध ठेवणे म्हणजेच सेक्स हा मानवी जीवनाचा एक भाग आहे. लैंगिक संबंधांमधूनच मूल जन्माला येते.
-
गर्भधारणेसाठी पुरुषाच्या शुक्राणूंना खूप महत्त्व असते. कारण शरीरसंबंधाच्या माध्यमातून स्त्रियांच्या गर्भाशयापर्यंत शुक्राणू पोहचतात आणि गर्भधारणेची प्रक्रिया सुरु होते. मात्र आजकाल पुरुषांना उद्भवणाऱ्या लैंगिक समस्यांमुळे मूल होण्यात अडचणी येतात.
-
पुरुषांच्या वीर्यामध्ये शुक्राणूंच्या कमतरतेमुळे महिला जोडीदार गर्भवती होण्याची शक्यता कमी होते.
-
जर एखाद्या पुरुषाच्या वीर्यामध्ये प्रति मिलीलीटर १५ दशलक्षांहून कमी शुक्राणू असतील तर त्याला लो स्पर्म काऊंट म्हणजेच शुक्राणूंची संख्या कमी आहे असं मानलं जातं.
-
तरुणांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होण्याची मुख्य कारणं म्हणजे त्यांचा आरोग्यविषयक निष्काळजीपणा आणि घड्याळाच्या काट्यावर धावणारी वेगवान जीवनशैली आहे. त्यामुळेच शुक्राणूंसंदर्भातील समस्या दूर करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.
-
धूर आणि प्रदूषण: स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ डॉ. लवली जेठवानी यांच्या मते, हवेच्या खराब गुणवत्तेमुळे जेव्हा आपण श्वास घेतो, तेव्हा हवेतील सूक्ष्म कण पॉलीसायक्लिक सुगंधी हायड्रोकार्बन्ससह शरीरात प्रवेश करतात. हे पुरुषांच्या शुक्राणूंसाठी हानिकारक असतात.
-
मात्र प्रदूषणाबरोबरच शुक्राणूंची संख्या कमी होण्यासाठी धुम्रपान करण्याची सवयही कारणीभूत असते. त्यामुळेच भविष्यात शुक्राणूंसंदर्भातील लैंगिक समस्यांपासून दूर रहायचं असेल तर सिगारेट अल्कोहोलपासूनही दूर राहणं फायद्याचं ठरतं.
-
लठ्ठपणा: आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शुक्राणूंची संख्या कमी होण्यामागे शरीरात चरबीचं प्रमाण अधिक असण्याबरोबरच उच्च बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) ही देखील प्रमुख कारणं आहेत.
-
टेस्टोस्टेरॉनमुळे शुक्राणूंची संख्या वाढवते परंतु लठ्ठपणामुळे टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते.
-
म्हणूनच अधिक वजन असणाऱ्यांनी वजनावर नियंत्रण मिळवल्यास त्यांना शुक्राणूंसंदर्भातील समस्या होण्याची शक्यता कमी असते.
-
धुम्रपानामुळे शुक्राणूंची संख्या आणि गतिशीलतेवर नकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे सिगारेट ओढणाऱ्या पुरुषांची प्रजनन क्षमता कमी झाल्याचे दिसून आले आहे.
-
धुम्रपानामुळे वीर्याच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो. धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींच्या निष्क्रिय शुक्राणूंची संख्या वाढू लागते. म्हणूनच पुरुषांनी धूम्रपानापासून दूर राहावे. गरोदर स्त्रियांसाठीही धुम्रपान फार धोकादायक असते.
-
मधुमेह: टाइप टू मधुमेह देखील कमी टेस्टोस्टेरॉन पातळी आणि वंध्यत्वाशी संबंधित आहे. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासोबतच वाढत्या वजनावरही नियंत्रण ठेवले पाहिजे.
-
मधुमेहावर नियंत्रण ठेवल्याने टेस्टोस्टेरॉनची पातळी सुधारू शकते आणि शुक्राणूंची संख्या वाढू शकते.
-
अल्कोहोलचे सेवन: वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ लोकेश कुमार मीना यांच्या मते, पुरुषांमधील सर्वात महत्त्वाचा हार्मोन टेस्टोस्टेरॉन मानला जातो.
-
या संप्रेरकामुळे पुरुषांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता चांगली राहते. तसेच हाडे व स्नायूंची वाढ, स्नायू शरीर इत्यादींच्या वाढीवरही याचा परिणाम होतो.
-
अल्कोहोलचे सेवन केल्यास यकृतावर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे एंड्रोजन हार्मोन इस्ट्रोजेनमध्ये बदलते. इस्ट्रोजेनमुळे वंध्यत्वाची समस्या निर्माण होऊ शकते.
-
एकंदरितच अगदी थोड्यात सांगायचं झाल्यास शुक्राणुंची संख्या, क्षमता आणि दर्जा हे सारं काही व्यक्तीच्या आरोग्यावर आणि त्याच्या सवयींवर अवलंबून असतं. त्यामुळे वेळीच जीवनशैलीमध्ये सकारात्मक सुधारणा केल्यास शुक्राणूंसंदर्भातील समस्यांपासून दूर राहणं सहज शक्य आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक, सौजन्य रॉयटर्स, इंडियन एक्सप्रेस आणि पिक्साबेवरुन साभार)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”