-
सध्या मुंबईसह राज्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे वातावरण उल्हासित होऊन गारवा जाणवतो आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
पावसाळ्यात निसर्गातील हिरवळीमुळे प्रसन्न वाटते. परंतु, हवाहवासा वाटणाऱ्या पावसाळ्यात अनेक समस्याही जाणवतात. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
त्यातीलच एक मोठी समस्या म्हणजे पावसाळ्यातील दमट वातावरणात कपडे सुकवणे.
-
पावसाळ्यात कपडे कसे सुकवायचे?, हा मोठा प्रश्न गृहिणींसोबतच सगळ्यांना सतावत असतो.
-
दमट वातावरणामुळे कपड्यांतील ओलावा तसाच राहतो. त्यामुळे कपडे सुकवण्यासाठी घरात दोऱ्या किंवा ऐनवेळी इस्त्रीचा वापरही करावा लागतो.
-
पण, पावसाळ्यात सोप्या टिप्स वापरून तुम्ही अगदी आरामात कपडे सुकवू शकता.
-
पावसाळ्यात कपडे घट्ट पिळूनच वाळत घाला. यामुळे ते लवकर सुकतील. तुम्ही जर वॉशिंग मशिनचा वापर करत असाल, तर कपडे मशीन मधून वाळवून घ्या.
-
शक्य असल्यास कपडे धुताना गरम किंवा कोमट पाण्याचा वापर करा. यामुळे कपड्यांमध्ये दमटपणा आल्याने ते लवकर कोरडे होतात.
-
दोरीवर कपडे वाळत घालताना त्यामधे पुरेसे अंतर ठेवा. जेणेकरून, कपडे लवकर कोरडे होण्यास मदत होईल.
-
टी-शर्ट किंवा शर्ट यांसारख्या कपड्यांसाठी हॅंगरचा वापर केल्यास उत्तम.
-
जर तुम्ही घरात कपडे वाळत घालत असाल तर घरातील खिडकी उघडी ठेवा. जेणेकरून घरात हवा खेळती राहून कपडे लवकर सुकतील आणि त्यांना कुबट वासही येणार नाही.
-
कपडे सुकत घालण्यासाठी स्टॅण्डचा वापर करणे फायदेशीर ठरेल.
-
शक्यतो, पावसाळ्यात सिल्क किंवा नायलॉनच्या कपड्यांचा वापर करा. त्यामुळे कपडे सुकवण्यास जास्त त्रास होणार नाही.
-
कपडे ९० टक्के सुकल्यानंतर त्यावर इस्त्री फिरवून तुम्ही ते घडी करून ठेवू शकता. पण, ओल्या कपड्यांवर इस्त्री फिरवू नका.
-
पावसाळ्यात कपड्यांना विशिष्ट प्रकारचा वास येतो. त्यासाठी कपडे धुताना पाण्यात थोडं व्हिनेगर घाला. (सर्व फोटो : Unsplash)

Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेचा भाऊदेखील पोलिसांच्या ताब्यात; वकीलाने सांगितलं कारण