-
१० जून (रविवारी) रोजी आषाढी एकादशी आहे. उपास म्हणजे आत्मशुद्धी असे शास्त्र सांगते. उपासाच्या दिवशी खाण्यापिण्याची बंधने पाळणे, एक दिवस पोटाला विश्रांती असा त्यामागचा उद्देश.
-
उपवासाच्या पदार्थांमध्येही कॅलरी वाढविणारे घटक असल्याने आरोग्याच्या दृष्टीने उपवास काहीवेळा अनारोग्यदायी ठरु शकतो. (फोटो सौजन्य : Pexels)
-
उपवास करणे म्हणजे पोटाला आराम देणे असल्याने या दिवशी आहारात हलक्या पदार्थांना समावेश करायला हवा. (फोटो सौजन्य : Pexels)
-
ताक, दूध, शहाळे पाणी, लिंबू सरबत यांसारख्या पेयांचा वापर केल्यास उपवासामुळे कमी होणारी ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. (फोटो सौजन्य : Pexels)
-
फक्त बटाटा खाण्यापेक्षा खजूर, राजगिरा, रताळे, सुकामेवा पदार्थ उपवासाला आवर्जून खा. (फोटो सौजन्य : Pexels)
-
यामुळे जास्त उर्जा मिळते. त्रास होण्याची शक्यताही कमी असते. (फोटो सौजन्य : Pexels)
-
साबुदाणा मर्यादेत खाल्ल्यास त्रास होत नाही. जास्त प्रमाणात खाल्ल्यास आरोग्याला त्रास होण्याची शक्यता असते. (फोटो सौजन्य : FreePik)
-
साबुदाणा खिचडी मर्यादेत खालली तर त्रास होत नाही. (फोटो सौजन्य : Social Media)
-
शेंगदाण्यामुळे पित्ताचा त्रास होऊ शकतो. (फोटो सौजन्य : Pexels)
-
कोणत्याही वयोगटातील व्यक्ती उपवास करत असेल तर त्याने आवर्जून फळ खायला हवी. (फोटो सौजन्य : Pexels)
-
फळातील साखरेमुळे शरीराला उर्जा मिळते. फळं पचायलाही सोप्पी असतात. (फोटो सौजन्य : Pexels)
-
उपवासाच्या दिवशी जास्तीत जास्त फळांचा आहारात समावेश ठेवल्यास भूक भागते. (फोटो सौजन्य : Pexels)
-
मधुमेही लोकांनी देखील उपाशी राहणे टाळावे. साबुदाणा, वरई हे पदार्थ खाणे टाळावे. (फोटो सौजन्य : FreePik)
-
उपासाचे पदार्थ कधीतरी खायला मिळतात म्हणून जर जास्तच खाणे झाले तर पित्त, वजन वाढ होते. त्यामुळे ते टाळणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य : Pexels)

५ मार्च राशिभविष्य: कृतिका नक्षत्रात १२ राशींच्या काम, खर्च व प्रेमाची स्थिती कशी असणार? पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?