-
देवी लक्ष्मी संपत्तीची देवी आहे. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात श्रीमंत व्हायचे असते. लक्ष्मीच्या कृपेशिवाय माणूस श्रीमंत होऊ शकत नाही. त्यामुळे जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर चुकूनही या ५ गोष्टी करू नका, कारण या गोष्टी करणाऱ्यांना देवी लक्ष्मी आपला आशीर्वाद देत नाहीत.
-
आळस – जे लोक आजचे काम उद्यावर ढकलतात. म्हणजेच जे आळशी असतात, असे व्यक्ती लक्ष्मीला आवडत नाही. अशा लोकांना कधीही यश मिळत नाही. आळसापासून दूर राहूनच लक्ष्मीची प्राप्ती होते.
-
क्रोध- क्रोध हा शास्त्रातील सर्वात वाईट दोषांपैकी एक आहे. श्रीमद भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण रागामुळे होणारे नुकसान देखील सांगतात. रागावलेल्या माणसाला कधीच आदर मिळत नाही, प्रत्येकाला त्याच्यापासून अंतर ठेवणे आवडते.
-
गर्व- जे काही यश मिळाल्यावर गर्व बाळगू लागतात, म्हणजेच अहंकारात बुडतात. अशा व्यक्तीचा सहवास लक्ष्मीजी लवकरच सोडतात आणि अहंकारी व्यक्ती स्वतःला श्रेष्ठ समजू लागते. इतरांचा आदर करायला विसरतो. अशा लोकांना लक्ष्मी आपला आशीर्वाद देत नाहीत.
-
लोभ- नेहमी लोभात मग्न असणारे लोक लक्ष्मीना आवडत नाहीत. लोभी माणूस हा स्वार्थी असतो, जो फक्त स्वतःचेच हित जपतो. अशा लोकांना लक्ष्मीची कृपा प्राप्त होत नाही.
-
नियम तोडणे- लक्ष्मीला शिस्त जास्त प्रिय असते, जे लोक प्रत्येक काम वेळेवर करतात. लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न होते. लक्ष्मीला नियम जास्त प्रिय असतात, जे नियमांचे पालन करून जगतात त्यांच्यावर लक्ष्मी कृपा करते. (All Photos: Freepik)
![Mesh To Meen Zodiac signs Daily Horoscope In Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Mesh-To-Meen-Zodiac-signs-Daily-Horoscope.jpg?w=300&h=200&crop=1)
६ फेब्रुवारी राशिभविष्य: सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष, सिंहच्या कुंडलीत होणार मोठे बदल; पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?