-
कालांतराने आपल्या त्वचेवर बारीक रेषा, सुरकुत्या आणि वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात.
-
अशावेळी त्वचेला आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा सुरू ठेवण्यासाठी आपल्या आहारात आणि जीवनशैलीत छोटे-छोटे पण सतत बदल करणे आवश्यक आहे.
-
दिवसातून किमान एक ग्लास भाज्यांचा रस प्या, पोषणतज्ञ गाजर, टोमॅटो आणि बीटच्या रस पिण्याचा सल्ला देतात कारण ते विषारी पदार्थ आणि त्वचेला साफ करण्यास मदत करतात.
-
धुम्रपानामुळे त्वचेचे लक्षणीय नुकसान होते, त्यामुळे शक्य तितक्या लवकर धूम्रपान सोडा.
-
मसालेदार आणि तळलेले पदार्थ शरीराला आजारी बनवतात, म्हणून त्यांचे सेवन कमी करा.
-
आहारात मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस् आणि ओमेगा फॅटी ऍसिडस्, जसे की फिश ऑइल, कॅनोला ऑइल, ऑलिव्ह ऑइल आणि अक्रोड्स अशा पदार्थांचा समावेश करा.
-
फळे आणि भाज्या, ज्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते ते खा. ज्यामुळे शरीर डिटॉक्सिफाय होते.
-
सर्वात महत्त्वाचे म्हणजे चमकदार त्वचा मिळविण्यासाठी ताजी फळे, भाज्या आणि ताजे शिजवलेले अन्न खाणे आवश्यक आहे.(सर्व फोटो सौजन्य: संग्रहित फोटो)
भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल