-
पावसाळ्यात लोकांना चहाबरोबर गरमागरम भजी खायला आवडते. (Photo : Freepik)
-
तुम्हालाही चहाबरोबर भजी खायला आवडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. (Photo : Shalini Rajani)
-
तुम्हाला माहीत आहे का की चहाबरोबर गरम भजी खाणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. (Photo : Freepik)
-
आज आपण, चहाबरोबर कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये, याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. (Photo : Pexels)
-
अशा काही गोष्टी आहेत, ज्याचे चहाबरोबर सेवन केल्यास शरीराला हानी पोहोचू शकते. (Photo : Freepik)
-
पावसाळ्यात बहुतेकवेळा आपण बेसनाच्या पिठात बनवलेली भजी चहाबरोबर खातो. पण नमकीन किंवा भजी यांसारख्या बेसनापासून बनवलेल्या गोष्टी चहाबरोबर खाणे ही आरोग्यदायी सवय नाही. (Photo : Sangeeta Khanna)
-
आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे की चहाबरोबर बेसनाचे पदार्थ खाल्ल्याने शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते आणि त्यामुळे पचनाच्या समस्याही उद्भवू शकतात. (Photo : Freepik)
-
याशिवाय चहाबरोबर कच्च्या भाज्या किंवा फळे खाऊ नयेत. (Photo : Pexels)
-
चहाबरोबर कच्च्या भाज्या किंवा फळे खाल्ल्याने आरोग्य आणि पोटाला हानी पोहोचते, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (Photo : Pexels)
-
त्यामुळे गरम चहाबरोबर सॅलड, अंकुरलेले धान्य किंवा उकडलेले अंडे खाणे टाळावे. (Photo : Pexels)
-
चहा प्यायल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये, असे तुम्ही ऐकले असेल. असे केल्याने पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. (Photo : Pexels)
-
यामुळे अॅसिडिटी किंवा पोटाच्या इतर समस्या उद्भवू शकतात, तसेच दातांचे नुकसान होऊ शकते. (Photo : Pexels)
-
जर तुम्ही चहाबरोबर हळदीचे सेवन केले तर ते तुमचे आरोग्य बिघडू शकते. (Photo : Pexels)
-
वास्तविक, हळद आरोग्यासाठी चांगली असते, पण ती चहाबरोबर खाल्ल्याने पोटाला हानी पोहोचते.
-
येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photo : Indian Express)
![12 February 2025 Horoscope In Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/12-February-2025-Horoscope.jpg?w=300&h=200&crop=1)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य