-
भाऊ-बहिणीच्या स्नेहाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
-
या दिवसाची तयारी म्हणून बहिणी रक्षाबंधनाच्या दिवशी खास दिसण्यासाठी स्वत:साठी छान ड्रेस घेतात.
-
अशा परिस्थितीत, या दिवशी आपल्या भावांनीही चांगली तयारी करावी आणि चांगले दिसावे अशी बहिणींची अपेक्षा असते.
-
तुम्ही बॉलिवूडच्या अभिनेत्यांकडून प्रेरणा घेऊन भारतीय पोशाख खरेदी करू शकता.
-
रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हालाही तुमच्या बहिणींना सरप्राईज द्यायचे असेल, तर आत्तापासूनच या दिवसाची तयारी सुरू करा.
-
रक्षाबंधनासाठी कुर्ता पायजमा हा सर्वोत्तम ड्रेस पर्याय आहे. कार्तिक आर्यनचा हा सुंदर आणि स्टायलिश शेरवानी स्टाइलचा इंडियन एथनिक ड्रेस तुम्ही या दिवशी परिधान करू शकता. (Photo : Instagram/ Kartik Aaryan)
-
या तपकिरी रंगाच्या आउटफिटवर थ्रेड वर्क अधिक स्टायलिश वाटत आहे. (Photo : Instagram/ Kartik Aaryan)
-
जर तुम्ही राखीच्या दिवशी काही सोबर रंग परिधान करू इच्छित असाल, तर विकी कौशलचा हा सुंदर स्काय ब्लू ड्रेस तुमच्यासाठी खरोखरच सर्वोत्तम असेल. (Photo : Instagram/Vicky Kaushal)
-
सिंगल कलरचा कुर्ता आणि त्यावर धाग्याचे काम असलेले नेहरू जॅकेट तुम्हाला खरोखरच खास बनवेल. (Photo : Instagram/Vicky Kaushal)
-
जर तुम्हाला या दिवशी थोडा स्टायलिश लुक हवा असेल तर तुम्ही शाहिद कपूरच्या या आउटफिटमधून कल्पना घेऊ शकता. (Photo : Instagram/Shahid Kapoor)
-
येथे त्याने कुर्ता, पायजमा आणि जॅकेट घातले आहे. अनइव्हन कटिंगसह काळ्या रंगाचे कुर्तेही आजकाल फॅशनमध्ये आहेत. (Photo : Instagram/Shahid Kapoor)
-
रक्षाबंधन आणखी खास बनवण्यासाठी, वरूण धवनसारखे हे रेशमी धोती कुर्ता आणि नेहरू जॅकेट वापरून पहा. (Photo : Instagram/Varun Dhawan)
-
यामुळे तुमचा लूक पूर्णपणे भारतीय होईल आणि बहिणी तुम्हाला पाहून आनंदित होतील. (Photo : Instagram/Varun Dhawan)
-
जर तुम्हाला या दिवशी थोडं क्लासी दिसायचं असेल तर रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही विकी कौशलचा हा पोशाख ट्राय करू शकता. (Photo : Instagram/Vicky Kaushal)
-
तुम्ही या ड्रेसला कोणत्याही हलक्या किंवा गडद रंगाच्या ड्रेसशी मॅच करू शकता आणि सणासाठी परफेक्ट लुक मिळवू शकता. (Photo : Instagram/Vicky Kaushal)

लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरे मोठी घोषणा करत म्हणाल्या…